अक्कलकोट :सीना नदीत पाणी सोडा अन्यथा तुमच्या सकट नदीत उतरू असा इशारा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी देतातच अखेर प्रशासन नरमाईची भूमिका घेत येत्या चार ते पाच दिवसात कोर्सेगाव पर्यंत पाणी सोडण्याचा लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिला.
सीना नदीमध्ये पाणी सोडण्यात संदर्भात गेल्या कित्येक दिवसापासून प्रशासनाने लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून दुर्लक्ष झाले आहे यासंदर्भात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी वेळोवेळी प्रशासनाला कोर्से गाव पर्यंत पाणी सोडण्यास संदर्भात त्यांनी आग्रही भूमिका घेतली परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सिना नदीमध्ये पाणी सोडला जात नव्हते.
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी परिसरातील सुमारे 28 गावातील शेतकरी प्रतिनिधींनी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना घेराव घालत पाणी सोडण्यास संदर्भात जाब विचारला.
याप्रसंगी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्याला धारेवर धरले. जोपर्यंत पाण्यासंदर्भात निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत या कार्यालयातून बाहेर न जाण्याचा इशारा माजी आमदार पाटील यांनी देताच प्रशासनानेही खडबडून जागे होत चार ते पाच दिवसात कोर्से गाव पर्यंत पाणी सोडण्याचा लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिला यानंतर माजी आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समोर चर्चा करून अखेर घेराव मागे घेण्यात आला.
याप्रसंगी युवा नेते दिलीप पाटील औरादचे शिवानंद वरशेट्टी महेश पाटील माजी सरपंच राम गायकवाड विद्याधर मुलगे रमेश कोटगी रामचंद्र अरवत लक्ष्मणपुत्र हालोळी ईरेश पाटील नागनाथ कोगनूरे मल्लिकार्जुन धारसंगे लिंबांना अरवत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने होते उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.