Latest Post



सोलापूर // प्रतिनिधी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे  पंतप्रधान पदाचा कार्यभार पूर्ण केला असून यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या व भारतीय जनता पार्टीचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या वतीने सेवा हेच संघटन या भावनेतून मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे मोफत सँनिटायझर, किटक नाशक फवारणी तसेच फेसशिल्ड, मास्कचे वाटप करण्यात आले कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कस म्हणजेच अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, पोस्ट अॉफीसकर्मचारी, तलाठी, कर्मचारी, आदीनां त्यांच्याक्ष सुरक्षेसाठी वाटप करण्यात आले.




भीमाचे संचालक बापुसो चव्हाण,ग्रा प सदस्य माऊली वसेकर,भाऊ सोनटक्के ,सिद्धेश्वर आनुसे,नवनाथ आनुसे,नाना सोनटक्के,धर्मराज वसेकर,ब्रम्हदेव वसेकर,सोनाप्पा सोनटक्के,नितीन चव्हाण दिगंबर वसेकर,पंकज चव्हाण,संजय सोनटक्के, सुनील यादव, आशोक गायकवाड, दगडू डोंगरे,भय्या डोंगरे,विशाल सोनटक्के,अक्षय गायकवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,तलाठी कोळी पोस्ट ऑफिस मास्तर बाळासाहेब फडतरे, तसेच अनेक नागरीक आदी मान्यवर उपस्थित होते.




सोलापूर // प्रतिनिधी 

असे ठणकावून सांगणार्या व सर्व स्री वर्गाला अभिमान वाटेल अशा  पद्धतीने आपलेच वाक्य स्वकर्तुत्वावर सत्य करून दाखवणार्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९६ वी जयंती आज सोमवार दिनांक ३१ मे, २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज येथे साजरी करण्यात आली.  यावेळी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, सरपंच शिवाजी शेंडगे, पांडुरंग ताठे, अहिल्याबाई होळकर तरूण मंडळाचे अध्यक्ष पंकज गावडे, आण्णासाहेब शेंडगे, विश्वास पांढरे, शिवरत्न तरूण मंडळाचे अध्यक्ष समाधान लोमटे, गणेश खरात, महादेव येळे, अनिल कोंडकर सर, पै सहदेव येळे, सचिन खरात सर, संतोष रणसिंग, राजू माने, उमेश होनकळस  व शाळेतील मुख्याध्यापक श्री तुकाराम गायकवाड सर, शिक्षक श्री सिद्धेश्वर भुई सर ग्रामपंचायत शिपाई आबा सावंत विश्वास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांडुरंग ताठे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले.   यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत जयंती साजरी करण्यात आली. व सर्व ग्रामस्थांनी मिळून सर्व नियमांचे पालन करत कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी तयारी करण्यासाठी शपथ घेतली.



सोलापूर // प्रतिनिधी

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन .पंढरपूर तहसील कार्यालय समोर  विठ्ठल सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना, दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा या कारखानाचे ऊस बिल, कामगारांचे पगार,ऊस वाहतूकीचे दाराचे बिले  त्वरित द्यावी यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन पंढरपूर तहसील कार्यालय दिनांक 16/ 6 / 2021 वार बुधवार पासून आहे .. 


यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ‌ज्ञानेश्वर जवळेकर म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ‌कारखानदार शेतक-यांना ‌आधार ‌देण्यासाठी त्यांचे हक्काचे ऊस बील व पगार  त्वरीत द्यावा

त्याचप्रमाणे सन 2019 24 आली सर्व पंढरपूर तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये महाभयंकर असा महापूर आला होता त्यामध्ये अनेक सर्व गोरगरीब शेतकऱ्यांची नगदी पिके अक्षरशा पाण्यामध्ये वाहून गेली होती व शेतजमिनी वाहून गेले होते त्याची अजूनही जिल्हा प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नसून पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील बऱ्याच अंशी शेतकऱ्यांची सुद्धा नुकसानभरपाई देणे बाकी असल्यामुळे याबाबतही बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी आवाज उठवण्याचे ठरले असून येत्या काही दिवसांमध्ये त्याबाबतही जिल्हा प्रशासनाला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे यावेळी जवळेकर यांनी सांगितले.



हे निवेदन देताना  बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, मोहोळ तालुकाध्यक्ष रमेश भोसले, मंगळवेढा तालुकाध्यक्ष दामाजी मोरे,सर्जराव‌ शेळके, किसान युवा क्रांतीचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह चंदनकर, रामेश्वर झांबरे, शेखर कोरके,रमेश लंगोटे, नितीन गावडे, मारुती कोळसे, सचिन जवळेकर,सुरज भांगे, अंकुश जवळेकर,प्रशांत मलशेट्टी, तानाजी सोनवले, औदुंबर ‌सुतार,अनंता लामकाने, अनिल शिंदे, ‌रामदास खराडे, शेतकरी उपस्थित होते.


सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोविड - १९ सेवा केंद्र कार्यालय उघडण्यात आली आहे . या सेवा केंद्राद्वारे कोरोनाचे तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. म्हणून सदर सेवा केंद्रास सर्वोतोपरी शासकीय मदत करावे . अशा मागणीचे निवेदन सोलापूरचे पालकमंत्री श्री . दत्तात्रय भरणे ( मामा ) यांना देण्यात आली आहे .         

मा. पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे ( मामा ) यांना वरील विषयी देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोरोना महामारीचा पहिल्या लाटेपासून कोरोना रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना प्रणित कोविड - १९ सेवा केंद्र स्थापना करण्यात आली . या सेवा केंद्राद्वारे जनजागृती करणे , विविध माध्यमातून मदत करणे , कोरोना रूग्णांना व कॉरन्टाईन रूग्णांना निर्माण झालेल्या अडचणी दूर करणे , कोरोना विरोधात शासन व प्रशासनाने केलेल्या नियम व बंधनाबाबत जनजागृती करणे , शासन व प्रशासन ज्या - ज्या वेळी सहकार्याची आपेक्षा घोषित करते , त्या - त्या वेळी मदत करणे , विशेष करून झोपडपट्टी , कामगार वस्त्या , बाजार पेठा , गर्दीच्या ठिकाणी नियमितपणे जनजागृती अभियान राबविणे आणि कोरोना प्रादुर्भावात नागरिकांना निर्माण होणारे अडचणी शासन व प्रशासनामार्फत पोहचविणे त्याच बरोबर सामाजिक दृष्टिकोनातून अन्नदान करणे , धान्य वाटप करणे , औषध वाटप करणे , आरोग्य शिबीर राबविणे असे विविध उपक्रम कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कामकाज केले व करीत आहोत.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने व स्थानिक प्रशासनाने अहोरात्र जटून यशस्वी प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच महाराष्ट्र व सोलापूर शहरात कोरोनाला आपण हरवू शकलो. असे असतांना जून - जुलै - ऑगस्ट २०२१ या महिन्यापासून कोरोना तिसरी लाट येणार आहे . अशी माहिती राज्य सरकार माध्यमाद्वारे दिले आहेत . या तिसऱ्या लाटेत सर्वांत जास्त धोका लहान मुलांना असल्याचे माहिती उल्लेख केला आहे . त्यामुळे ही तिसरी लाट रोखणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे . कारण आपल्या देशाचा भविष्य म्हणजेच लहान मुले , भविष्यालाच धोका निर्माण होणे हे अत्यंत गंभीर बाब आहे . म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोविड - १९ सेवा केंद्राद्वारे कोरोना हटाव - सोलापूर बचाव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे . यासाठी शासन , प्रशासन , पोलिस खाता , डॉक्टर , समाजसेवक , लोकप्रतिनिधी , व्यापारी , कारखानदार , सामाजिक संघटना , समाजातील प्रतिष्टित लोक , कलाकार , कामगार , विद्यार्थी या सर्वांची मदत घेऊन सोलापूर शहर हे कोरोनामुक्त करणारच असा निर्धार सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी यांनी केला आहे. 

तरी माननीयांनी आमच्या या अभियानाला सर्वोतोपरी मदत करावी . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले .



यंदा दणक्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


आयएमडीने यावेळी पहिल्यांदाच देशातील ३६ हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात ‘ला निनो’ स्थिती तयार झाल्याचा फायदा मान्सूनला होणार आहे. त्यामुळे उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता आहे. भारताच्या दृष्टीने शेतीचे क्षेत्र व त्या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने हवामान विभागाने यंदा प्रामुख्याने शेतीक्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्चित केला आहे. त्या ठिकाणी १०६% पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


हवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण आणि पूर्व विदर्भात जूनमध्ये सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. 

आगमन उशिरा?

सध्या केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. अंदमानात पोहोचलेला मान्सून केरळात पोहोचल्याचे जाहीर करण्यासाठी आवश्यक पाऊसमान, वाऱ्यांची दिशा हे निकष अजून पूर्ण झालेेले नाहीत. यंदा मान्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. पुढील वाटचालीस उशीर होऊ शकतो.

दुष्काळाची शक्यता अगदी कमी

‘मॉन्सून मॉडेल’नुसार यंदा दुष्काळ म्हणजेच सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता फक्त ८ टक्केच आहे. सरासरीच्या ९० ते ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता  १८ टक्के आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ अशा सर्वसाधारण पावसाची शक्यता ४०% आहे.  सरासरीपेक्षा जास्त १०४ ते ११० टक्के पावसाची शक्यता २२ टक्के आहे, तर खूप जास्त म्हणजे सरासरीच्या ११० टक्के पावसाची शक्यता १२ टक्के आहे.

 



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधतात्मक योजनेच्या अनुषंगाने विविध प्रतिबंधतात्मक आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन सोलापूर ग्रामीण जिल्हयातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दीवरील १७३ लहान-मोठे रस्ते बंद करून लोकांच्या येण्या-जाण्याकरीता व वाहतुकी करीता प्रतिबंध करणे आवश्यक आहे असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये मला प्राप्त असलेल्या कायदयाच्या आधारे २४/०४/२०२१ रोजी ००.०१ ते दिनांक ०१/०५/२०२१ रोजी ०७.०० वाजेपर्यंत सोलापूर ग्रामीण जिल्हयातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दीवरील सोबत जोडलेल्या परिशिष्ट ०१ मधील नमुद १७३ लहान-मोठे मार्ग बंद करून त्या मार्गाना परिशिष्ट ०२ मधील नमुद २६ लहान मोठे मार्ग अत्यावश्यक सेवा करीता पर्यायी मार्ग म्हणुन चालू ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिवानिशा / कोरोना विषाणु प्रतिबंध / वाहतुक नियमन / २०२१ / ३८८ दिनांक २३/०४/२०२१ अन्वये दिलेले होते त्यांनतर महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या निर्देशनानुसार सदरचा आदेश हा दिनांक १५/०५/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत व पुन्हा दिनांक ०१/०६/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत कायम करण्यात करण्यात आलेला होता.


ज्या अर्थी महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील क. DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक ३० मे २०२१ अन्वये तसेच जिल्हा प्रशासनाने जा.क्र. २०२१ / डीसीबी/०२/आरआर/२४२६ दिनांक ३१/०५/२०२१ अन्वये ब्रेक द चैन अंतर्गत लागू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी यापुर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध दिनांक ०१/०६/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वाजेपासुन दिनांक १५/०६/२०२१ रोजी सकाळी ०७. .00 वाजेपर्यत लागू ठेवण्याचे आवश्यक असल्याचे निर्देशीत केले आहे.


त्या अर्थी मी तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये मला प्राप्त असलेल्या कायदयाच्या आधारानुसार दिनांक १४/०५/२०२१ रोजी दिलेला आदेश हा दिनांक ०१/०६/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वाजेपासुन दिनांक १५/०६/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत कायम करण्यात येत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget