सोलापूर // प्रतिनिधी
असे ठणकावून सांगणार्या व सर्व स्री वर्गाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने आपलेच वाक्य स्वकर्तुत्वावर सत्य करून दाखवणार्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९६ वी जयंती आज सोमवार दिनांक ३१ मे, २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज येथे साजरी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, सरपंच शिवाजी शेंडगे, पांडुरंग ताठे, अहिल्याबाई होळकर तरूण मंडळाचे अध्यक्ष पंकज गावडे, आण्णासाहेब शेंडगे, विश्वास पांढरे, शिवरत्न तरूण मंडळाचे अध्यक्ष समाधान लोमटे, गणेश खरात, महादेव येळे, अनिल कोंडकर सर, पै सहदेव येळे, सचिन खरात सर, संतोष रणसिंग, राजू माने, उमेश होनकळस व शाळेतील मुख्याध्यापक श्री तुकाराम गायकवाड सर, शिक्षक श्री सिद्धेश्वर भुई सर ग्रामपंचायत शिपाई आबा सावंत विश्वास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांडुरंग ताठे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत जयंती साजरी करण्यात आली. व सर्व ग्रामस्थांनी मिळून सर्व नियमांचे पालन करत कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी तयारी करण्यासाठी शपथ घेतली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.