पुणे येथील कर्वे रोडवरील गॅलक्सी हॉस्पिटल च्या हलगर्जी पणामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे हॉस्पिटलवरती कार्यवाही व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करवा अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे.




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
अशा प्रकारचे बरेच प्रकार पुणे व आसपासच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या तिला पाहायला मिळत असून हे याचे उत्तम उदाहरण आहे या कर्वे रोडवरील गॅलेक्सी हॉस्पिटल च्या गलथान कारभार याच्या अगोदर सर्वांसमोर आला असून यामध्ये बऱ्याच तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारच्या हॉस्पिटल वर मान्य महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे महाराष्ट्र राज्य युवा प्रदेशाध्यक्ष अजीत संचेती यांनी केली आहे.

पुणे येथील कर्वे रोडवरील गॅलक्सी हॉस्पिटल च्या हलगर्जी पणामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे हॉस्पिटल वर कार्यवाही व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या निवेदनास प्रसिद्धी मिळण्याबाबत

वरील विषयाच्या अनुषंगाने वडगाव मावळ येथील दत्तात्रय भिकू ढोरे हे कर्वे रोड वरील गॅलक्सी हॉस्पिटल मध्ये उपचार साठी ऍडमिट झाले होते, व त्यांची सोमवारी रात्री कोरोना चाचणी साठी स्वब घेण्यात आले व मंगळवारी रिपोर्ट आला असता त्याना आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार होत नाही असे सांगून त्याना हॉस्पिटलमधून बाहेर काढले,कोरोनाच्या सध्या आपल्या पुणे जिल्हयात सुरू असलेल्या महामारी चा विचार ना करता त्यांची कसल्या ही प्रकारची व्यवस्था करता त्याना वाय सी एम हॉस्पिटल ला पाठवून दिले.

वाय सी एम मध्ये बेड उपलब्ध नाही आहेत,हे माहिती असून हॉस्पिटलच्या हलगर्जी पणा मुळे त्या कोरोना रुग्णाला आपला जीव गमवावा लागला,आपण ह्या हॉस्पिटल वर लवकरात लवकर कार्यवाही करावी व हॉस्पिटलच्या संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टी या हॉस्पिटल विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल ही नम्र विनंती.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget