सोलापूर // प्रतिनिधी
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन .पंढरपूर तहसील कार्यालय समोर विठ्ठल सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना, दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा या कारखानाचे ऊस बिल, कामगारांचे पगार,ऊस वाहतूकीचे दाराचे बिले त्वरित द्यावी यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन पंढरपूर तहसील कार्यालय दिनांक 16/ 6 / 2021 वार बुधवार पासून आहे ..
यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील सर्वच कारखानदार शेतक-यांना आधार देण्यासाठी त्यांचे हक्काचे ऊस बील व पगार त्वरीत द्यावा
त्याचप्रमाणे सन 2019 24 आली सर्व पंढरपूर तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये महाभयंकर असा महापूर आला होता त्यामध्ये अनेक सर्व गोरगरीब शेतकऱ्यांची नगदी पिके अक्षरशा पाण्यामध्ये वाहून गेली होती व शेतजमिनी वाहून गेले होते त्याची अजूनही जिल्हा प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नसून पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील बऱ्याच अंशी शेतकऱ्यांची सुद्धा नुकसानभरपाई देणे बाकी असल्यामुळे याबाबतही बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी आवाज उठवण्याचे ठरले असून येत्या काही दिवसांमध्ये त्याबाबतही जिल्हा प्रशासनाला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे यावेळी जवळेकर यांनी सांगितले.
हे निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, मोहोळ तालुकाध्यक्ष रमेश भोसले, मंगळवेढा तालुकाध्यक्ष दामाजी मोरे,सर्जराव शेळके, किसान युवा क्रांतीचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह चंदनकर, रामेश्वर झांबरे, शेखर कोरके,रमेश लंगोटे, नितीन गावडे, मारुती कोळसे, सचिन जवळेकर,सुरज भांगे, अंकुश जवळेकर,प्रशांत मलशेट्टी, तानाजी सोनवले, औदुंबर सुतार,अनंता लामकाने, अनिल शिंदे, रामदास खराडे, शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.