सोलापूर // प्रतिनिधी
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोविड - १९ सेवा केंद्र कार्यालय उघडण्यात आली आहे . या सेवा केंद्राद्वारे कोरोनाचे तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. म्हणून सदर सेवा केंद्रास सर्वोतोपरी शासकीय मदत करावे . अशा मागणीचे निवेदन सोलापूरचे पालकमंत्री श्री . दत्तात्रय भरणे ( मामा ) यांना देण्यात आली आहे .
मा. पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे ( मामा ) यांना वरील विषयी देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोरोना महामारीचा पहिल्या लाटेपासून कोरोना रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना प्रणित कोविड - १९ सेवा केंद्र स्थापना करण्यात आली . या सेवा केंद्राद्वारे जनजागृती करणे , विविध माध्यमातून मदत करणे , कोरोना रूग्णांना व कॉरन्टाईन रूग्णांना निर्माण झालेल्या अडचणी दूर करणे , कोरोना विरोधात शासन व प्रशासनाने केलेल्या नियम व बंधनाबाबत जनजागृती करणे , शासन व प्रशासन ज्या - ज्या वेळी सहकार्याची आपेक्षा घोषित करते , त्या - त्या वेळी मदत करणे , विशेष करून झोपडपट्टी , कामगार वस्त्या , बाजार पेठा , गर्दीच्या ठिकाणी नियमितपणे जनजागृती अभियान राबविणे आणि कोरोना प्रादुर्भावात नागरिकांना निर्माण होणारे अडचणी शासन व प्रशासनामार्फत पोहचविणे त्याच बरोबर सामाजिक दृष्टिकोनातून अन्नदान करणे , धान्य वाटप करणे , औषध वाटप करणे , आरोग्य शिबीर राबविणे असे विविध उपक्रम कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कामकाज केले व करीत आहोत.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने व स्थानिक प्रशासनाने अहोरात्र जटून यशस्वी प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच महाराष्ट्र व सोलापूर शहरात कोरोनाला आपण हरवू शकलो. असे असतांना जून - जुलै - ऑगस्ट २०२१ या महिन्यापासून कोरोना तिसरी लाट येणार आहे . अशी माहिती राज्य सरकार माध्यमाद्वारे दिले आहेत . या तिसऱ्या लाटेत सर्वांत जास्त धोका लहान मुलांना असल्याचे माहिती उल्लेख केला आहे . त्यामुळे ही तिसरी लाट रोखणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे . कारण आपल्या देशाचा भविष्य म्हणजेच लहान मुले , भविष्यालाच धोका निर्माण होणे हे अत्यंत गंभीर बाब आहे . म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोविड - १९ सेवा केंद्राद्वारे कोरोना हटाव - सोलापूर बचाव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे . यासाठी शासन , प्रशासन , पोलिस खाता , डॉक्टर , समाजसेवक , लोकप्रतिनिधी , व्यापारी , कारखानदार , सामाजिक संघटना , समाजातील प्रतिष्टित लोक , कलाकार , कामगार , विद्यार्थी या सर्वांची मदत घेऊन सोलापूर शहर हे कोरोनामुक्त करणारच असा निर्धार सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी यांनी केला आहे.
तरी माननीयांनी आमच्या या अभियानाला सर्वोतोपरी मदत करावी . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.