सोलापूर मनपाच्या आयुक्तपदी पी. सिवा संकर यांची नियुक्ती, दीपक तावरे यांची तडकाफडकी बदली



[सोलापूर // प्रतिनिधी]: सोलापूरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना आदी मुद्द्यांवरुन महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पी. सिवा संकर यांची नियुक्ती केल्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी काढले आहे. 
पी. सिवा संकर यांना मनपा आयुक्त पदाची जबाबदारी त्वरित स्वीकारून तसे प्रशासनाला कळविण्यास सांगितले आहे. तसेच दीपक तावरे यांची अध्यक्ष व्यवस्थापक संचालक, महाराष्ट्र वखार महामंडळ, पुणे येथे बदली करण्यात आले आहे. 
आज सकाळीच येथील प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनद्वारे संवाद साधून सोलापूरची परिस्थिती सांगितले. यावेळी अजित पवार यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सचिव अजोय महेता यांना सोलापूरातील जिल्हाधिकारी व आयुक्तांची बदली करण्यासाठी सांगितल्याचे म्हंटले होते. आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद साधल्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाहणी करण्यासाठी रवाना झाले. तोवर तावरे यांच्या बदली झाल्याचे कळले. आता नूतन आयुक्त पी. सिवा संकर यांच्यापुढे सोलापूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आणि शहर हद्दीतील यंत्रमाग, गारमेंट व विडी उद्योग सुरु करण्याची मोठी जबाबदारी आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget