पंढरपूर प्रतिनिधी:- स्वतःचे राहते घर क्वारंटाईन करण्यासाठी देणारा सोलापूर जिल्ह्यातील पहिला म्हणून आमदार भारत नाना भालके यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांनी आजच आपले सांगोला रस्त्यावरील घर (बंगला) क्वारंटाईन करण्यासाठी देण्याची तयारी आज दाखविली आहे
त्याच बरोबर त्यांनी आज पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिनजी ढोले यांच्याकडे बंगला देण्यात येणार सांगितले आहे.
पंढरपूर शहराची सुमारे सव्वा लाख लोक संख्या आहे. त्यातच शहरात कोरोना बाधित रूग्ण संख्या वाढू लागली आहे.पुणे, मुंबईसह इतर राज्यातून आतापर्यंत सुमारे सहा हजारांहून अधिक लोक शहर व तालुक्यात आले आहेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील मठ, धर्मशाळा आणि मठामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकरण केले आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहाता, आमदार भारत भालके यांनी आज आपला राहाता बंगला लोकांसाठी खाली करून देणार असल्याचे जाहीर केले. या दुमजली बंगल्यामध्ये जवळपास 100 हून बेड बसतील.
यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील आपण उपलब्ध करून देणार आहे. या ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी देखील सोय केली जाईल. यापूर्वीच आमदार भालके यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील आरोग्य केंद्रासाठी सुमारे 25 लाख रूपयांचा निधी दिला आहे. या निधीमधून त्यांनी मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझरसह आवश्यक वैद्यकीय साधने खरेदीसाठी हा निधी खर्ची केला आहे. आणखी काही निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही आमदार भारत(नाना)भालके यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.