मक्याचे हमी भाव केंद्र सुरू करावे भाजपाचे राजाभाऊ जगदाळे यांची निवेदनाद्वारे मागणी



पंढरपूर // प्रतिनिधी

सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव त्याच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाजारामध्ये मक्‍याचे दर 1200 / 1300/ रुपये प्रति क्विंटल इतके कमी करून शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करण्याचे काम व्यापारी वर्गाकडून होत असल्याचे लक्षात आल्यामुळे काल पंढरपूरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार वैशालीताई वाघमारे मॅडम यांना शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत मका या भरडधान्यस शासनाने 1760 /रुपये प्रतिक्विंटल हमीभाव नेमून दिलेला आहे. त्याकरिता शासनाच्या हमीभाव भरड धान्य खरेदी योजना अंतर्गत आपल्या तालुक्यातील शासनाने नियुक्त केलेली नोडल एजन्सी पंढरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या संस्थेत लवकरात लवकर मक्याचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत, व त्यासाठी लागणारे गोडाऊन  व इतर साहित्य आपल्या स्तरावर उपलब्ध करून देऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवणे कमी मक्याचे आधारभुत हमीभाव धान्य  खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश लवकरात लवकर देणे बाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीणचे उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत तहसीलदार मॅडम यांना दिले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget