विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 111 रक्तदान.





पंढरपूर प्रतिनिधी:-  राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या वतीने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 111 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. तालुक्यातून दीड ते दोन हजार रक्ताच्या पिशव्या संकलन करण्यात येणार असल्याचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले.



कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी काळात रक्ताची गरज भासणार आहे. ही रक्ताची गरज ओळखून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनानुसार माढा तालुक्‍यातुन दीड ते दोन हजार रक्ताच्या पिशव्या संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.1 जून ते 10 जून पर्यंत तालुक्यात विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आहे. रक्तदात्यांना विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यामार्फत  हॅन्ड सॅनिटायझर बॉटल व मास्क वाटप ची वाटप करण्यात आले. यापूर्वी माढा येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 150, कुर्डूवाडी 225, पिंपळनेर 150  व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 111 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.



रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक तथा जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या  शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे सुरूवातीस कै.मा.आ.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी निमगांव टे उपसरपंच रविंद्र शिंदे, अंबाड चे भारत गाडे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस.रणवरे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव, मुख्य शेतकी अधिकारी एस.पी.थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम.आर.भादुले, वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे,चिफ केमिस्ट पी.एस.येलपले, फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर, परचेस ऑफिसर जे.डी. देवडकर सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget