वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यात कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2436 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजारांच्यावर पोहोचली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे तर 35156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 438 झाली आहे. तर ॲक्टिव रुग्ण 4 हजार 428 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 258 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील 8 हजार 916 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टि रुग्ण संख्या 3 हजार 111 आहे. कोरोनाबाधित एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.