गोरगरिबांची लालपरी 15जूनपासून धावणार पण असे आहेत नियम.




वृत्तसंस्था प्रतिनिधी:- लाॅकडाउन दरम्यान गेले दोन महिने चाके रुतलेली ग्रामीण भागाची जनवाहीनी अर्थात एसटीची चाके येत्या १५ जूनपासून तालुकांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा धावणार आहेत.

पुणे विभागातील सर्व आगार प्रमुखांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना लाॅकडाउनमुळे ठप्प झालेली एसटीची प्रवासी वाहतूक पुर्वपदावर आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे.

पुणे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी चार टप्प्यांत याचे नियोजन केले आहे. पहील्या टप्प्यात पंधरा जुनपासून सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रमुख मार्ग, मोठ्या लोकवस्तीची गावे तसेच टोकाची गाव ते तालुका, आगार अशा किमान तीन फेऱ्या सुरु केल्या जातील.

दुस-या टप्प्यात तालुका व तालुक्याचे प्रमुख गाव ते जिल्हा मुख्यालय किमान तासांचे वारंवारता किंवा गरजेप्रमाणे फे-या सुरु होतील.

तिस-या टप्प्यात तालुका आणि आगार ते शेजारील तालुक्यात मागणीप्रमाणे फ-या सुरु करण्यात येतील. चौथ्या अर्थात शेवटच्या टप्प्यात जिल्हा बंदी उठल्यानंतर जिल्हा मुख्यालय तसेल जिल्ह्यातील आगारांतून शेजारील जिल्ह्यातील आगाराच्या ठिकाणी बससेवा सुरु करण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन ठरले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानुषंगाने फेरीवर जाण्यापूर्वी आणि फेरी करुन आल्यानंतर एसटी बसचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. तसेच चढ उतार करणा-या प्रवाशांना देखील बसस्थानकावर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाईल. अशी माहिती त्यांनी दिली

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget