पंढरपूर दि.07 सध्या भारत देशासह आपल्या पंढरपूर परिसरामध्ये कोरोना या महामारीच्या रूग्णांना रक्त पुरवठा कमी पडत असल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारतनाना भालके यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये रक्तदान शिबिर आयेाजित करणेबाबत आ.श्री भारत भालके यांचे संपर्क कार्यालय, पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक व सर्व पदाधिकारी यांचे समवेत आज दि.07.06.2020 रोजी मिटिंग पार पडली.
सदर मिटिंगमध्ये पंढरपूर शहरामध्ये दि.10.06.2020 रोजी सकाळी 9 ते दु.4 पर्यंत श्रीसंत गाडगेबाबा धर्मशाळा, स्टेशन रोड, पंढरपूर येथे व ग्रामीण भागामध्येही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरले. तसेच सदर रक्तदान शिबिरामध्ये कोव्हिड 19 चे शासनाचे सर्व नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरलेले आहे.
सदर शिबिरामध्ये जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून देशहिताचे कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडविण्यासाठी आपण रक्तदान करावे असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारतनाना भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केले आहे.
सदर मिटिंग मध्ये ज्येष्ठ पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर व ग्रामीणचे पदाधिकारी, नगरसेवक, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.