पहिल्या दिवशी सोडली 226 चारचाकी व तीनचाकी वाहने



सोलापूर // प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात लॉकडाउन दरम्यान जप्त केलेली 226 तीनचाकी आणि चारचाकी वाहने आज सोडण्यात आली. आता बुधवारपासून दुचाकी वाहने सोडली जाणार आहेत. यानिमित्ताने एकाच जागी थांबलेल्या गाड्या पुन्हा चालू करण्यासाठी मालकांची दमछाक झाल्याचे दिसले.

शहरातील तीन हजार 601 दुचाकी तर 194 रिक्षा आणि 97 चारचाकी वाहने पोलिसांनी कारवाई दरम्यान जप्त केली होती. मागील दीड महिन्यांपासून ही वाहने एकाच ठिकाणी असल्याने काही गाड्या चालू होत नव्हत्या. काहींनी धक्का मारत तर काहींनी मेकॅनिकला बोलवून गाडी दुरुस्त करून नेली. वाहतूक शाखेने आवाहन केले होते की संबंधित वाहनचालकाकडे येताना तोंडाला मास्क अथवा रूमाल लावलेला असावा. त्यांच्याकडे सॅनिटायझर असावे.

जप्त केलेली वाहने घेऊन जाण्यापूर्वी वाहनचालकांना त्या वाहनावरील पूर्वीचा संपूर्ण दंड भरावा लागला. पूर्वीचा दंड नसल्यास त्या वाहनचालकाला 250 रुपये रोखीने द्यावे लागतील. सुटे पैसे घेऊन यावेत. हे आवाहन बहुतेक वाहनचालकांनी पाळले होते. जप्त केलेली पोलिस मुख्यालयातील 300 तर नॉर्थकोट मैदानावरील 300 वाहने रोज टप्प्या-टप्प्याने सोडली जाणार आहेत. त्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल केली जाणार आहे.

येताना "हे' लक्षात ठेवावे
नागरिकांनी वाहन घेऊन वस्तू खरेदीसाठी जाऊ नये. जप्त केलेली दुचाकी वाहने उद्यापासून (बुधवारी) सोडून दिली जाणार आहेत. मात्र, संबंधित वाहन मालकाने वाहन सोडवून नेताना दंडाची रक्कम भरण्यासाठी सुटे पैसे आणावेत. सकाळी नऊ ते दुपारी 12 आणि दुपारी चार ते रात्री सात या वेळेत ही वाहने सोडली जातील.

अशोक काणे,पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget