पुण्याला दिलासा! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्‍क्‍यावर


वृत्तसंस्था // प्रतिनिधी

देशभरात जून आणि जुलै महिन्यात करोना रुग्णांचा उद्रेक होईल, अशी शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असतानाच जूनच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील एकूण रुग्णांपैकी बरे होणाऱ्यांची संख्या 63 टक्‍क्‍यावर गेली आहे. तर, मृत्यूदरही 5.12 टक्‍क्‍यावरून 4.96 टक्‍के झाला आहे. तर, एकूण बाधितांच्या अवघे 34 टक्‍के जण उपचार घेत आहेत.

शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित आढळून आला. त्यानंतर मागील तीन महिन्यांत शहरातील एकूण रुग्णांचा आकडा 7 हजार 747 झाला आहे. त्यातील तब्बल 4,575 जणांना घरी सोडले आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 62.77 टक्‍के आहे. त्याचवेळी शहरात 369 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 4.6 टक्‍के आहे. तर, सध्या शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत सुमारे 2,402 जण उपचार घेत आहे. त्यातील 45 जणांची प्रकृती गंभीर आहे.

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 15 मे रोजीच हेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.7 टक्‍के होते. तर मृत्यूचे प्रमाण 5.6 टक्‍के होते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण हे 42 टक्‍के होते. मात्र, एका बाजूला शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांचाही आकडा वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget