सोलापूर // प्रतिनिधी
मी सागर भारत साळुंखे छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आपणास निवेदन सादर करतो की,
राज्यात 22 मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना लॉकडॉऊन नंतर घरगुती ग्राहकांचे विद्युत बिल देण्यात आलेले नाही आणि आता तीन महिन्यानंतर एकदम विद्युत वीजबिल देण्यात येईल अशी माहिती आहे.
लोकांना तीन महिने झाले काम-धंदा नाही,जे लोक भाड्याने राहतात त्यांना भाडे भरावे लागत आहे.तसेच गरीब मध्यम वर्गीय कुटुंबाला अशक्य होईल आणि पुन्हा अंधारात राहावे लागणार काय अशी भीती वर्तवली जात आहे.त्यामुळे वीजबिल भरणे सर्वसामान्य,गोर गरीब कुटुंबियांसमोर फार मोठे संकट ठरणार आहे.त्यामुळे या तीन महिन्यातील वीजबिल पूर्णपणे माफ करण्यात यावे व माफ झालेच पाहिजे,अशी मागणी छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने मी सागर भारत साळुंखे, रोहित पंडित सुतार,विशाल डोंगरे,अक्षय खाडे, कृष्णत तुपे,सुजित लादे,सिद्राम कसकी,अजिंक्य कांबळे,सागर शिंदे आम्ही करीत आहोत.
कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये मोलमजुरी करणारे कामगार,छोटे मोठे उद्दोग धंदेवाले,अस्थाई कामगार, शेतकरी, शेतमजूर यांनी कठीण काळामध्ये उदरनिर्वाह चालविला आहे.आता थोड्या प्रमाणात कामे सुरू झालेली असली तरी अद्यापही अनेकांना उत्पनाचे साधन प्राप्त झालेले नाही.यावेळी महिन्याचे एकत्रित वीजबिल आल्यानंतर या बिलापोटी भरणा करणे या कुटुंबाला शक्य होणार नाही आणि वीज खंडित करण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.याकरिता महाराष्ट्र शासनास आमची विनंती की,या कोरोना संक्रमण काळात अडचणीत आलेल्या सर्वसामान्य, गोर गरीब जनतेचे लाईट बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे व लाईट बिल पूर्णपणे माफ झालेच पाहिजे,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आम्ही देत आहोत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.