वृत्तसंस्था // प्रतिनिधी
न्यु सातारा पॉलिटेक्निक, कोर्टी या महाविद्यालयाच्या वतीने इ. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन ‘करिअर मार्गदर्शन’ वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध माइंड गुरु व लाईफ कोच मा. श्री. नानासाहेब साठे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. विक्रम लोंढे यांच्या संकल्पनेतून सदर ‘करिअर मार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन दि. १० जून २०२० रोजी सकाळी १०:४५ वा. ऑनलाईन ZOOM ऍप्लीकेशन द्वारा करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. स्वप्नील गंडाळे यांनी प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. नानासाहेब साठे यांचा परिचय सर्व विद्यार्थ्यांना करून दिला व त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मा. श्री. नानासाहेब साठे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात करिअर निवडत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे याचे महत्व पटवून देत असताना काही व्हिडीओ सादरीकरण केले. तसेच भविष्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये येणाऱ्या सुवर्णकाळाचे महत्व हि पटवून दिले कारण येणारा काळ हा व्यावसायिक शिक्षणाचाच असणार आहे असे हि त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडत असताना स्वताला कोणत्या गोष्टींमध्ये आपले टॅलेंट आहे याचा विचार करून त्यांनी त्यांचे करिअर निवडावे असा सल्ला हि दिला. मा. श्री. नानासाहेब साठे यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विख्यात मोटीवेशनल स्पीकर मा.नानासाहेब साठे यांचे आजतागायत १००० पेक्षा जास्त सेमिनार झाले आहेत तसेच त्यांनी २०० पेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले व त्या प्रश्नांचे समाधान महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी केले तसेच मा. श्री. नानासाहेब साठे व सर्व उपस्थित विद्यार्थ्याचे आभार प्राचार्यांनी त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.