वृत्तसंस्था // प्रतिनिधी
साताऱ्यात कोरोना बाधित व कोरोना प्रादुर्भाव अंतर्गत आणि इतर आजाराने निधन झालेल्या मयताच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये मदत द्यावी., अशी मागणी छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने,
मी सागर भारत साळुंखे, रोहित पंडित सुतार,विशाल डोंगरे,अक्षय खाडे, कृष्णत तुपे,सुजित लादे, सिद्राम कसकी,अजिंक्य कांबळे, सागर शिंदे आम्ही आपणाकडे निवेदनाव्दारे करीत आहोत.
कोरोना या महामारीमुळे संपूर्ण जगच हादरुन गेले आहे.त्यामुळे भारत सरकारने कोरोना प्रादुर्भावापासून संपूर्ण भारत वासीयांच्या संरक्षणासाठी आणि कोरोनाला हरविण्यासाठी २२ मार्च २०२० पासून ते ३० जून २०२० पर्यंत टप्या-टप्याने लॉकडाऊन जाहीर केले आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील जनतेने लॉकडाऊन काळात कोविड-१९ चे सर्व नियम पालन केले. त्याच धरतीवर साताऱ्यात देखील सातारावासियांनी अत्यंत गंभीरतेने कोविड-१९ चे नियम पाळला. तरीही २२ मार्च पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण सातारामध्ये नव्हता परंतू २२ मार्चपासून आज तारखेपर्यंत सातारा जिल्ह्यात १०१२ इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले. या रुग्णांमध्ये ४३ इतके रुग्णांचे दुर्दैवाने निधन झाले.
साताऱ्यातील कोरोनामुळे ४३ निधन झालेल्यामध्ये स्त्री, पुरुष व लहान मुले, मुली यांचा समावेश होता. निधन झालेले जे रुग्ण आहेत. त्यापैकी बहुतेक लोक हे त्यांच्या कुटुंबियाचा प्रमुख कर्ता आहेत. त्यामुळे निधन झालेले कुटुंब निराधार होऊन रस्त्यावर आले
आहेत. किंवा निधन झालेल्या स्त्रियांदेखील घरातील कमवता व्यक्ती होती म्हणून त्यांचेही कुटुंब रस्त्यावर आले आणि लहान मुले व मुली यांचे निधन झाले हे कुटुंबातील लहान मुलं असल्या कारणाने त्यांच्या विरहाने कुटुंबच उध्दवस्त झाले.असे अनेक कारणे या कोरोना बाधित,सारी व इतर रुग्णांच्या निधनामुळे निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गेल्या ३ ते ४ महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सरकारी धान्य मदती विना कुठेही आर्थिक उत्पन्न किंवा मदत यांना मिळाली नाही आणि कामही नाही. म्हणजेच साताऱ्यातील ४३ कुटुंबियांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे आहे तरी माननीयांनी साताऱ्यातील कोरोना बाधित व कोरोना प्रार्दुभाव अंतर्गत सारी आणि इतर आजाराने मयत झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत करावी ही नम्र विनंती.
छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने सदर मागणीचे निवेदन ई-मेलव्दारे आपणास पाठविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे सदर निवेदन १) मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र, राज्य मुंबई. २) उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, राज्य मुंबई. ३) मा. अर्थमंत्री, महाराष्ट्र, राज्य मुंबई. ४.मा. पालकमंत्री साहेब, सातारा जिल्हा. यांना पाठविण्यात

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.