पंढरपूर प्रतिनिधी:- गेल्यावर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे अआवे व जांभूड गावाला जोडलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा आवेकडील बाजूचा भरावा हा पाटबंधारे विभागाच्या गलत नाद कारभारामुळे वाहून गेला आहे त्या भराव्या बरोबर तेथील शेतकऱ्यांचे नऊ ते दहा एकर शेतीही त्या पाण्याबरोबर वाहून गेलेल्या आणि त्या ठिकाणी खोल 30 फुटाचा खड्डा पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे.यावर्षी मोठा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे येथे चालू असलेल्या कामाची यंत्रणा वाढवून जलद गतीने काम करून मिळावे अशी तेथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
याबरोबरच ज्या शेतकऱ्यांची गेल्या वर्षीच्या परतीच्या पावसाच्या पुरामध्ये नऊ ते दहा एकर शेती वाहून गेल्यामुळे त्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी.
जांबुड व आवे या दोन गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे या बंधाऱ्यासाठी व येथील आवक-जावक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून रोड करण्यात आला त्या शेतकऱ्यांना गेली बारा वर्ष एक रुपयाही आर्थिक मोबदला मिळाला नाही तरी तो त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा अशी तेथील शेतकऱ्यांची सरकारला विनंती केली. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना परीट समाजाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष मा श्री गणेश ननवरे यांच्या वतीने देण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.