भारत चीन सीमेवर चकमकीत शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.



सोलापूर // प्रतिनिधी

भारत-चीन सीमा रेषेवर, गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताचे वीर जवान शहीद झाले. शहीद झालेल्या वीर जवानांना सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस प्रदेश सचिव सुमित भोसले, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, युवक काँग्रेस उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, कार्याध्यक्ष ओमकार गायकवाड़, उपाध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे श्रद्धांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना विनोद भोसले म्हणाले की चीन हा नेहमीच भारतासोबत विश्वासघात करत आला आहे. 1962 साली सुद्धा हिंदी चीनी भाई भाई म्हणत भारताशी युद्ध केले होते. आणि काल सुद्धा भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात चकमकित माघार घेतो म्हणत विश्वासघात करुन भारतीय सैनिकांवर हल्ला चढविला या मध्ये आपले वीस जवान शहीद झाले. गेल्या चार पाच वर्षात पंतप्रधान मोदीजी चीन ला अनेक वेळा गेले चीनी पंतप्रधान भारतात आले. अनेक वेळा चर्चा झाली मोदी जी आत्ता बातचीत सोडा. चीन चा बेमुर्तखोरपणा वाढत चालला असून केंद्र सरकारने देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेऊन चीन वर कारवाई करुण चीन ला धड़ा शिकवावा. काँग्रेस पक्ष आणि देशातील सर्व जनता देशहितासाठी केंद्र सरकार सोबत उभा राहणार आहे.

यावेळी शाहु सलगर, सुभाष वाघमारे, राजू निलगंटी, आनंद भंडारे, लक्ष्मण मास, श्रीनिवास परकीपंडला आदि उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget