पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पाश्रर्वभुमीवर दिनांक 22मार्च पासून समाजातील सर्वच घटकांची अत्यंत कठीण परिस्थितीत झाली आहे.मंडई,रिक्षा,पान शाॅप,जनरल स्टोअर्स छोटे उद्योग धंदे करणारे स्वयंरोजागर वाले कामगार वर्ग आधी सर्वाचे आपापले रोजीरोटीचे व्यवसाय एकतर पुर्णपणे बंद आहेत.किंवा शासनाने दिलेल्या सवलतीच्या वेळेस रडतखडत सुरू आहेत अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत सामाना प्रत्येक सोलापूरकर नागरिकांना करावा लागत आहे.अशा कठीण परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती मधील नागरिकांच्या मिळकतीची सण 2020ते2021या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टी लाईट वीजबिल रक्कम माफ करणे बाबत राज्य शासनाने योग्य निर्णय घेतला पाहिजे शासनाने असा निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थानी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत राज्य शासनास शिफारस करावी अशी सुचना शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना सुचना दिल्या.कोरोनाने जगभर थैमान घातले असून अनेक देशांचे कंबरडे मोडले असतानाही सामान्य माणूस जगला पाहिजे.अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.राज्य शासन देखील कृषी विषयक तसेच वीज बिलाबाबत नागरिकांना सवलत देण्यात अनेक उपाययोजना आहेत.त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थानी हद्दीमधील मिळकतधारांचा धारकांची या वर्षीची मिळकत घ्यावा.नागरिकांना दिलासा घ्यावा.अशी आमची ठाम भूमिका आहे. ज्यावेळी दैनंदिन गरजा भागवणे सोलापूर नागरिक धडपडत आहेत.त्यावेळी त्यांच्यावर घरपट्टी पाणीपट्टी लाईट वीजबिलचा बोजा न टाकता नागरिकांच्या जगण्याला माणुसकीच्या भावनेतून शासनाने बळ दिले पाहिजे.अशी आमची मनापासूनची इच्छा असल्याचेही ही संदिप मुटकुळे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिक अडचण असताना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आहे. म्हणूनच सण 2020/21या आर्थिक वर्षातील नागरी हद्दीतील सर्व नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी लाईट वीजबिलची रक्कम राज्य शासनाने माफ करणे आम्हाला गरजेचे वाटते किंवाहुना अशा संसर्गजन्य रोगाच्या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील घरपट्टी आणि पाणीपट्टी लाईट वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने प्राधान्याने घेणे आवश्यक आहे.अशा शब्दात शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी आपल्या भावना महाविकास आघाडी सरकारकडे व्यक्त केल्या.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.