वृत्तसंस्था // प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज बारामती येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली.. गेल्या काही दिवसापासून विधानपरिषद सदस्यांच्या तिकिटावरुन चर्चा सुरू आहे.. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळण्याची शक्यता आहे या चार जागा पैकी एक जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे.. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि स्वाभिमानी संघटनेचे काही नेते उपस्थित होते..शेवटी स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचे दिसून आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.