उजनीवरील फ्लेमिंगो पक्ष्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर दीर्घकाळ उजनीवर वास्तव्य.




सोलापूर प्रतिनिधी :- प्रवाशी पक्ष्यांसाठी नंदनवन म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर कच्छच्या रणातून हिवाळ्यात येऊन दाखल झालेले नजाकतदार फ्लेमिंगोंचा परतीच्या प्रवास लांबणीवर पडला आहे. सामान्यपणे पावसाळ्याच्या प्रारंभी आपल्या मूळ ठिकाणी परतून जाणारे हे पक्षी मोठ्या थवेने उजनी जलाशयाच्या ठिकठिकाणच्या काठावर विहार करताना दिसताहेत.
कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या टाळेबंदी मुळे मानवी जीवन ठप्प झाले आहे. परिणामी रस्त्यावरील माणसाचा वर्दळ, वाहनांची गजबज, जलाशयात रोखलेले मासेमारी, पर्यटकांची अनुपस्थिती आदी कारणामुळे प्रदूषणाला आळा बसून उजनी परिसर पक्ष्यांच्या मुक्त वावरासाठी पोषक ठरत आहे.
पाण्यातील जलचर व काठावरील चिखलयुक्त दलदलीत विपुल खाद्य उपलब्ध असल्याने हे विदेशी पक्षी आपला मुक्काम वाढविल्याचा अंदाज पक्षी अभ्यासकांकडून केला जात आहे. सध्या उजनी परिसरात आपली व्याप्ती वाढवून विहार करतात त्यांना ग्रेटर फ्लेमिंगो असे म्हणतात. सामान्यपणे माणसाएवढे आकार असलोल्या या पक्ष्यांना निसर्गाने अफाट सौंदर्य बहाल केला आहे. गुलाबी रंगाची वक्राकार छोटी चोच, गुलाबी रंगमिश्रित पंख व लांबलचक पाय, झुपकेदार शेपटी, लांब गोल काठी सारखे मान, गोल गरगरीत छोटे डोळे हे या पक्ष्यातील वैशिष्ट्ये आहेत.पंखांच्या आतील बाजू रक्तवर्णीय असून हे पक्षी उड्डाण घेतल्यानंतर लालभडक रंगाने अतिशय मनमोहक वाटतात. उडताना लालभडक दिसण्यावरूनच या पक्ष्यांना अग्निपंख या नावनेही ओळखतात. पाण्याचा काठावरील यांच्यातील सामूहिक वावर पण रंजक असतो. हे पक्षी समूहाने चालताना सैनिकांसारखे शिस्त बद्ध कवायती करत चालतात. कळपात वयोवृद्ध पक्ष्यांपासून नवीन पिल्ले ही समूहाने वावरत असतात.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget