सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा रुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात भेट दिली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिकेचे आयुक्त आदी शासकीय अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.
या वेळी मा.श्री.आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेला निधी उपलब्ध करण्याची मागणी केली .तसेच आरोग्य विभागात रिक्त जागेवर कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करण्यास स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावेत नागरिकांची इतर आजरासाठी हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करून घेणे .महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळून देण्याच्या सूचना संबंधित हॉस्पिटलला देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.
यावेळी खासदार डॉ जयसिद्धेस्वर महास्वामीजीं, मा. श्री. खासदार रणजितसिंह निंबाळकर, मा. श्री.आमदार सुभाषबापू देशमुख, मा.श्री.आमदार विजयकुमार देशमुख,मा. श्री.आमदार राजाभाऊ राऊत मा. श्री. आमदार सचिनदादा कल्यांणशेट्टी,मा. श्री.आमदार रणजितसिंह मोहिते_पाटील,मा.श्री. चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.अनिरुद्ध कांबळे जिल्हा अध्यक्ष शहाजीभाऊ पवार उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.