कोणत्याही प्रकारचे कर्जाची हप्ते वसुली वीज कनेक्शन कट केल्यास कारवाई करणार:- पालकमंत्री दत्तात्रय भरणे



सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स तसेच  वित्तिय संस्थेच्या मार्फत कोणत्याही प्रकारची कर्ज हप्ते वसुली केल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी तसेच विविध कारणांसाठी नागरिकांनी कर्ज घेतले आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सक्तीने कर्जाच्या हप्त्याची वसुली करणे तातडीने थांबवावी. महिला बचत गटांना  त्रास देऊन, सक्तीने कर्जाचे हप्ते वसूली केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे यांनी माहिती दिली.मागील वर्षाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात  कोरोनापेक्षा जास्त आहे.  कोरोना नसताना गत वर्षी मृत्यू संख्या अधिक होती. कोरोनामुळे तरी सुद्धा मृत्यूदर कमी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अनलॉक असतानाही सोलापूरकरांनी नियम पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये तरच कोरोनाचे संक्रमण कमी होईल असेही पालकमंत्री यांनी सांगितले.
येत्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव 80 टक्के वाढेल अशी भीती वैशंपायन डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यक्त केली होती. ही भीती रास्तच आहे. नागरिकांनी अनलॉक मध्ये नियम न पाळल्यास कोरोनाचा विळखा वाढू शकतो. जर नियम पाळल्यास कोरोनाचे संक्रमण कमी होईल.यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पी . शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  ग्रामीण पोलीसचे अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संजीव पाटील, वैशंपायन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर

घर मालकांनी घर भाडेसाठी तगादा लावू नये
सध्या लॉकडाऊन मध्ये  घर मालकांनी घर भाड्या साठी तगादा लावू नये. कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी झाल्यास घर भाडे वसूल करावे. विनाकारण भाडेकरूंना त्रास देऊ नये, भाडे वसुलीसाठी तगादा लावू नये असेही भरणे यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget