पंढरपूर // प्रतिनिधी
सर्वसामान्य व्यावसाकिय, मजूर यांना पंढरपूर अर्बन बँकेचे पहिल्या टप्यातील कर्ज वितरण कोरोना काळातील लॉकडाऊन नंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या रोंजदारीवर कामकरणारे कामगार, लहानमोठे व्यावसायिकांनी आत्मनिर्भरपणे उभे राहणेसाठी बँक सर्वोतोपरी सहकार्य करेल या प्रसंगास धैर्याने सामोरे जावे असे आवाहन पंढरपूर अर्बन बँकेचे पहिल्या टप्प्यातील कर्ज वितरणाचे वेळी बँकेचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी केलेे. कोरोना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या काळात पंढरपूर बँकेने रिझर्व्ह बँकेचे निकष पाळून मागेल त्याला कर्ज तत्काळ उपलब्ध करून देणेबाबत जनता आत्मसन्मान कर्ज योजना कार्यान्वित करून त्यातील आज सुमारे ५०० हून अधिक लहान मोठ्या व्यावसायिकांना प्रत्येकी रू.१०,००० ते रू.५०,००० पर्यंत असे जवळपास अडीच कोटी रूपयांचे पहिल्या टप्प्यातील कर्ज वाटप सोशल डिन्स्टसिंगसह कर्मयोगी सभागृह, पंढरपूर येथे करून सुरवात करणेत आली.
यावेळी बोलताना चेअरमन आ.परिचारक म्हणाले, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाने मागील अनेक दिवसापासून लॉकाडाऊन जाहीर केल्यामुळे हातावर पोट असणार्यांवर अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. प्रवासी व मालवाहतूक वाहनधारक, टांगा-रिक्षा, केश कर्तनकार, चर्मकार, वाहन दुरूस्ती करणारे मेकॅनिक, टेलर, पेंटर, प्लंबर, परीट, केटरींगकडील कामगार, मजूर, रोडच्या कडेला विक्री करणारे, भाजीपाला विक्रेते, हातगाडेवाले, हारफुलविक्रेते व्यावसायिक इत्यादी व्यवसाय करणारे तसेच कापड, जनरल स्टोअर्स, ऍटोमोबाईल्स, फोटोग्राफर, यात्रेवर व्यवसाय करणारे कुंकू बुक्का, चुरमुरे, पेढे विक्रेते प्रासादिक भांडार, बांगडी व्यवसायधारक व त्यांच्या कुटुंबियास गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याकाळात सावकारी, खाजगी फायनान्स यामुळे सर्वसामान्यांवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
यातून बाहेर पडणेसाठी आपले पंढरपूर बँकेने शासकीय योजना जाहीर होणेपुर्वीच सर्वसामान्य जनतेसाठी मार्ग काढीत कमीत कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बँकेचा प्रतिनिधी प्रत्यक्ष व्यवसायाचे ठिकाणी मासिक अथवा दैनंदिन येवून हप्ता घेवून जाणेची सोयही बँकेतर्फे देणेत आलेली आहे. कर्ज घेतलेपासून कर्जदारांना आर्थिक सुलभता येईपर्यंत ३ महिने कालावधीत हप्ता न भरण्याची सूटही बँकेतर्फे देणेत आली आहे. कर्जदारांनी नियमीत परतफेड करून बँकेकडे पत निर्माण केल्यास भविष्यात व्यवसायवृध्दीसाठी बँकेतर्फे आणखी कर्जाची रक्कमवाढवून देणेचे आश्वासन यावेळी आ.परिचारक यांनी दिले. या योजने अंतर्गत जास्तीत जास्त लोकांना मदत करणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी दिली. अडचणीच्या काळात बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांना मोठा दिलासा आणि आर्थिक आधार मिळाला आहे.
सदर प्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, संचालक रजनीश कवठेकर, उदय उत्पात, हरिष ताठे, शांताराम कुलकर्णी, सतीश मुळे, पांडुरंग घंटी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, मुन्नागीर गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, चंद्रकांत निकते, सोमनाथ होरणे, संचालिका सौ.रेखाताई अभंगराव, सौ.माधुरीताई जोशी, तज्ञ संचालक भालचंद्र कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक भालचंद्र जोशी व अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.