ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढ अक्कलकोटमध्ये कोरोनाचा दुसरा बळी




सोलापूर प्रतिनिधी  : अक्कलकोट शहरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आज अक्कलकोटमधील आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

अक्कलकोट शहरात एकूण बाधितांची संख्या 12 झाली असून आज मौलाली गल्ली येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. अक्कलकोट येथील एकूण मृत्यूची संख्या आता दोन झाली आहे. 

आतापर्यंत अक्कलकोटमधील 12 रूग्णांपैकी 7 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर 3 जणांवर उपचार सुरू आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील एका फरशी उद्योजकाचा कोरोनाने मृत झाला होता. त्याच्या संपर्कातील एकूण सात जणांना कोरोनाची बाधा झाली होती. ते सर्व जण व्यवस्थित उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, एकच दिवस शांत गेल्यानंतर लगेच मौलाली गल्ली येथे राहणाऱ्या एका एसटी वाहकास कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर तिथेच राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीस तर समर्थनगर येथे राहणाऱ्या एका डॉक्‍टरास कोरोनाची बाधा झाली आहे. हे तिघेही सोलापूर येथे उपचार घेत आहेत. दरम्यान, आज मौलाली गल्ली येथे राहणाऱ्या आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे आता एकूण अक्कलकोटमध्ये कोरोनाचे 12 कोरोना रुग्ण झाले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. आता मौलाली गल्ली येथे एकूण तीन रुग्ण झाले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget