विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या भोसे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद




पंढरपूर // प्रतिनिधी

आपल्या देशात व राज्यामध्ये कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून केंद्र व राज्यशासन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.अशा स्थितीमध्ये कोरोना बाधीत तसेच इतर रूग्णांवर उपचारा दरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असल्याने सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे.
मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे यांनी माढा तालुक्यामध्ये दि.01 ते 10 जून या कालावधीमध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असून 1500 ते 2000 रक्ताच्या पिशव्या संकलन करणेचा मानस आहे.रक्तदान शिबिरास  प्रारंभ झालेला असून आज भोसे गटामध्ये  कारखान्याचे सभासद,वाहनमालक, मिळुन आतापर्यंत 155 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे तसेच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यामार्फत रक्तदान करणा-या रक्तदात्यांना एक हॅन्ड सॅनिटायझर बॉटल व मास्क वाटप करण्यात येत आहेत.

सदर प्रसंगी श्री.राजु (बापु) पाटील,मोहन (आण्णा) कोळेकर, रायाप्पा हळवनकर महेश खटके,नागेश उपासे,( जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक)  हरीश्चंद्र तळेकर,(ब्रम्हदेव पवार, (गुरुजी) संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखाना), दिनकर बापु कदम संचालक सहकार शिरोमणी कारखाना भाळवणी तुकाराम मस्के, विश्वनाथ भिंगारे, नारायण कोरके, मोहन तळेकर, संजय तळेकर, मारुती कोरके,  वैजिनाथ कोकरे, नागेश गावंधरे, अभिमान थिटे, पोपट थिटे, भाऊ साहेब देवकर, अंगद चिखलकर, सज्जन भोसले, रमेश चिखलकर, दगडु कांबळे, गोपाळ पिंपरकर, , पांडुरंग पवार, नितीन कदम, दिलीप काळे, संजय काळे, योगेश सावंत, किसन कौलगे, गणेश चव्हाण, नवनाथ माळी, विकास भोसले, राहुल नाईकनवरे, दाजी जगताप, हरीदास खरात,  मुख्य शेती अधिकारी संभाजी थिटे अॅग्रीओव्हरसिअर प्रमोद कोळेकर,बंडु पवार व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget