केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले दि.१२ जून रोजी करणार निसर्ग वादळग्रस्त कोकणचा पाहणी दौरा




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणचा पाहणी दौरा शुक्रवार दि.१२ जून रोजी  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय  अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले करणार आहेत.

निसर्ग वादळग्रस्त कोकण पाहणी  दौऱ्यात दि. 12जून रोजी सकाळी मुंबईहून मंडणगड कडे ना.रामदास आठवले रवाना होणार असून सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी आंबडवे येथे ना.रामदास आठवले भेट देऊन वादळाने झलेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मंडणगड तालुक्यातील सावरी,पचारळ, वेळास, बाणकोट या गावांना भेट देऊन रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमंडला , हरिहरेश्वर या गावांना भेटी देऊन  माणगाव मार्गे मुंबई ला परतणार आहेत.  अशी माहिती रिपाइं तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget