अनवली गावचे सुपुत्र तोफिक शेख यांचा पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने "कोविड योध्दा" म्हणून सन्मान



पंढरपूर // प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातील एक होतकरू तरुण पोलीस पाटील तौफिक शेख यांना नुकतेच पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब आले असताना त्यांच्या हस्ते करवाढ योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दोन ते अडीच महिन्याच्या लाँकडाउनच्या कालावधीत संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्यातून लॉकडाऊन असताना अतिशय महत्त्वपूर्ण अशी उल्लेखनीय कार्य मा. तौफिक शेख यांनी केले आहे.
गोरगरिबांच्या सदैव अडचणीमध्ये धावून जाऊन त्यांना मदत करणे त्याचप्रमाणे सर्व सामाजिक बांधिलकी जपत सर्व स्तरातील कामे करणे यामुळे तौफिक शेख यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांना पुरस्कार प्रदान करताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब किरण अवचर साहेब,  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत नाना भालके, किरण घाडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी तौफिक शेख यांनी सांगितले की; माझ्या कामाची दखल घेऊन माझा सन्मान केला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी फार ऋणी आहे यापुढे असेच समाजाचे मोठे कार्य माझ्या हातून घडो असे मनोगत यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget