सुपंत ऊस विकास दिनदर्शिका, सुपंत जिवाणू खतांचेही वाटप
सोलापूर प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगाम 2019-20 मध्ये गाळप केलेल्या निडवा ऊसाचे प्रती मे.टन रु.100/- प्रमाणे अनुदान आज रोजी संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुपंत जिवाणू खतांचे उधारीने वाटप तसेच उस विकास दिनदर्शीकेचे मोफत वाटप करणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
कारखान्याचे आदरणीय चेअरमन श्री सुधाकरपंत परिचारकसाहेब यांनी गळीत हंगाम 2019-20 मध्ये कारखान्याचे ऊस गाळपाचे उदिष्ट पूर्ण करणेसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निडवा ऊस ठेवणेबाबत आवाहन केले होते. या आवाहनास कारखान्याच्या ऊस उत्पाद़कांनी भरपूर प्रतिसाद देवून निडवा ऊस कारखान्याकडे गाळपास दिला होता. निडवा ऊस ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा अंतर मशागतीवरील खर्च कमी होतो तसेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यास कमी पाण्यामध्ये उत्पन्न मिळेल हा विचार करुन ही योजना राबविण्यात आली होती.
कारखाना व्यवस्थापनाने हंगाम 2019-20 मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे 100/- रुपयाचे निडवा अनुदान, सुपंत दिनदर्शिका, सुपंत जिवाणू खते देवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले असून पुढील गाळप हंगाम 2020-21 मध्ये कारखान्याने ठेवलेले ऊस गाळपाचे उदिष्ट निश्चित पूर्ण होईल.
-:कार्यकारी संचालक
मा.यशवंराव कुलकर्णी
त्यामुळे कारखान्याचे गळीत हंगाम 2019-20 मध्ये गाळपाचे उदिष्ट पूर्ण होणेस मदत झाली आहे. आदरणीय चेअरमन सुधाकरपंत परिचारक व व्यवस्थापनाने निडवा ऊस उत्पादकांना त्यावेळी निडवा ऊसास प्रती मे.टन रु.100/- प्रमाणे अनुदान देणेचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे निडवा अनुदानाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने निडवा ऊस उत्पादकांना निडवा अनुदान देवून एक नवा आदर्श घालून दिला आहे. तसेच गळीत हंगाम 2020-21 साठी आवश्यक असणारी कारखान्यामधील सर्व कामे प्रगतीपथावर असून कारखाना लवकरच गाळपासाठी सज्ज होईल. यावेळी कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारकसोा यांनी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाळप हंगाम 2020-21 साठी लागवड केलेल्या संपूर्ण ऊसाच्या नोंदी श्री पांडुरंग कारखान्याकडे देण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याचप्रमाणे पांडुरंग कारखान्यामार्फत उच्च गुणवंतेचे सुपंत जीवाणू खते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकाकरिता उधारीने कारखान्याचे गट ऑफिस येथे उपलब्ध करुन दिले आहेत तसेच ऊस उत्पादन वाढी करिता आवश्यक असणारी माहितीपूर्ण ऊस विकास दिनदर्शिका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घरपोच देण्यात येत आहे. याचा लाभ ऊस उत्पादकांनी घ्यावा.
तसेच या हंगामासाठीचे संपूर्ण तोडणी वहातुकीचे करार झालेले असून त्यांना प्रती वहान टोळी रु.2,00,000/- प्रमाणे पहिला ऍ़डव्हान्स हप्त्याचे वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस तोडणी व वहातुक यंत्रणाही सज्ज आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे गाळप हंगाम 2020-21 साठी कारखान्याकडे ऊसाची उपलब्धता भरपूर असून त्या सर्व ऊसाचे, गाळप वेळेवर करणार आहोत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वेळेवर पाऊस झालेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकरी टनेजमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्री.सुधाकरपंत परिचारक, व्हा.चेअरमन श्री.वसंतराव देशमुख, आमदार श्री प्रशांतराव परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.




Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.