फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेजच्या 21 विद्यार्थ्याची नामांकीत कंपनीत निवड


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट यांच्या वतीने  ऑनलाईन कॅम्पस ड्राइव्ह दिनांक 29 जुन व 1 जुलै रोजी पार पडला. सदर ड्राइव्ह हा यशस्वी ग्रुप या पुण्याच्या नामांकीत कंपणी मार्फत  घेण्यात आला होता. या ड्राइव्हची  सर्व प्रक्रिया ऑनलाईनद्वारे राबविण्यात आली. डिग्री व डिप्लोमा या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये तब्बल 21 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या मुलाखती यशस्वी ग्रुप पुणे यांच्या मार्फत कंपनीचे एच. आर. श्री.नितीन देठे व त्यांची संपुर्ण टीम यांनी  पार पाडल्या. यावेळी विद्यार्थ्याना कंपनीची सर्व माहिती,कार्याचे स्वरूप,सेवा-सुविधा याबद्दल  माहिती देण्यात आली. कोविड 19  पासुन कर्मचारी यांचे संरक्षण करण्यासाठी प्रक्रिया पूर्णपणे राबवत काम कसे करता येईल याचीही अमलबजावणी केली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्वरित कामावर रुजू होण्यासाठी कंपन्यांणी  सुचना दिल्या आहेत. सदर ड्राइव्ह अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी.शेंडगे, पॉलीटेक्निचे प्राचार्य प्रा.शरद पवार,स्टूडन्ट  डिन प्रा. टी एन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला. निवड झालेल्या  सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्री भाऊसाहेब रुपनर,कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी अभिनंदन केले. हा ड्राइव्ह  टीपीओ अधिकारी डॉ. सहेबगौडा त्यांचे सहकारी निलेशकुमार आडत व त्यांची संपुर्ण टीम यांनी यशस्वी पार पाडला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget