दूध दराबाबत केंद्र, राज्य सरकारला सुबुद्धी देवो; राजू शेट्टींनी शंभू महादेवाकडे घातले साकडे


वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूधाला ५ रुपये अनुदान देण्यासाठी सुबुद्धी देवो, शेतकऱ्यांवरचे संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज उदगाव (ता. शिरोळ) येथील पुरातन श्रावणच्या पहिला दिवशी श्री रामलिंग मंदिरात दुधाचा अभिषेक करून साकडे घातले.

ज्यभरात दुधाला अनुदान मिळावे यासाठी मंगळवारी दूध आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, राजू शेट्टी यांनी मंगळवारी सकाळी प्रथम उदगाव येथे कृष्णा काठावर असलेल्या श्री पुरातन रामलिंग मंदिरात दुधाचा अभिषेक घातला. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला सुबुद्धी येऊ दे, असे साकडे घातले. दुधाचा अनुदान मिळवण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा यासाठी मंगळवारी प्राथमिक स्वरूपात आंदोलन करण्यात आले आहे. सरकारने निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानीकडून करू या मारू आशा प्रकारचे आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

तसेच राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रूपयांवरून 180 रूपयांवर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशांत निर्यात बंद झाली आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे.

तरीही केंद्र सरकार 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयांवरून 220 रूपये झाला आहे. याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था 17 ते 20 रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा दुध आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी  दिलीप गुरव, सागर मादनाईक, शंकर नाळे,  शौलेश आडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

उदगाव येथे दुधाचे टँकर रोखले

उदगाव येथे गोकुळ, स्वाभिमानी, अमूल असे तीन दुधाचे संघ आहेत. स्वाभिमानी व अमूलने दूध बंद करून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर गोकुळने दूध संकलन चालू ठेवले होते. त्यामुळे सुमारे २० दुधाचे टँकर रोखून आंदोलन केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget