पंढरपूर // प्रतिनिधी
लाॅकडाऊनमुळे वासुदेव समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील मुलांना शासनाने शिक्षण व नोकरी देण्याची तरतूद करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केले.महाराष्ट्रातील वासुदेव समाज हा भिक्षेकरू आहे.कोरोनामुळे या समाजाला अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. लाॅकडाऊनाच्या काळात या समाजातील नागरिकांना दारोदारी जाऊन भिक्षा मागणे शक्य नाही.त्यामध्ये हा समाज पंढरपूरातील चार वारर्या यावर ते त्याचे उदरनिर्वाह करत होते.लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केल्यापासून त्याचे संपूर्ण कुटूंब उपासी राहत आहे.त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे.या वासुदेव समाजातील नागरिकांना शासनाने मदत करावी.वासुदेव समाजातील मुलांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी.समाजातील मुलां मुलींना शिक्षण व नोकरी देण्याची तरतूद करण्यात यावी.असे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी व्यक्त केले. तरी महाविकास आघाडी सरकारने वासुदेव समाजाला न्याय देण्याचे काम करावे असे शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे म्हणाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.