अंतिम वर्षातील परीक्षेबाबात सोलापूर विद्यापीठाने निर्णय जाहीर करण्यातबाबत


पंढरपूर // प्रतिनिधी
अंतिम वर्षातील परीक्षेबाबात विद्यापीठाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.विद्यापीठ अनुदान आयोगाने पूर्वी संबंधित जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहुन परीक्षेबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते.मात्र राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परीक्षा होतील.असे स्पष्ट केले.त्यांतर विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यातबाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.त्यामुळे कोरोनाच्या भितीमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत चिंता वाढली आहे.दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या पारंपारिक अभ्यासक्रमाच्या 20हजार विद्यार्थ्यापैकी नऊ हजार विद्यार्थ्यांनी काहीच पर्याय निवडलेला नाही.तर दुसरीकडे साडेआकर हजार विद्यार्थ्यापैकी 89टक्के विद्यार्थ्यानी परीक्षा नकोच हा पर्याय निवडला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परीक्षेबाबत तात्काळ ठोस निर्णय घेवून विद्यार्थ्यामधील संभ्रम दूर करावा.अन्याथा कोरोनाबाबत मनात असलेली भिती,राज्य सरकारने परीक्षा रद्दचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी निश्चित झाले आहेत.अशा परिस्थितीत विद्यापीठाने निर्णय न घेतल्यास चिंतेत असलेल्या काही विद्यार्थ्यामध्ये अनुचित प्रकार घडण्याची शकत्या नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षेबाबत निर्णय जाहीर करावा.अन्याथा आगामी परिणामास विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल.असे निवेदनामध्ये नमुद केले आहे. तरी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी विद्यापीला आदेश काढून निर्णय घ्यावा.असे शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget