महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) व सोलापूर मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबीराचे ऊद्धघाटन व आर्सीनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.



सोलापूर // प्रतिनिधी

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, आमदार प्रणीती शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली एस टी वर्कर्स कांग्रेस इंटक व सोमपा आरोग्य विभाग यांच्या विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबीर ऊद्धघाटन व आर्सीनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप एस टी स्टैंड विभागीय कार्यालय सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी तपासून आरोग्य सल्ला व औषधे दिले. तसेच आर्सीनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरात 350 एस टी कर्मचारयांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले या कोरोनाच्या संकटकाळात ही एस टी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून वाहतूक सेवा देत आहेत त्यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच या आरोग्य शिबिराचे कौतुक केले. मी सदैव एस टी कर्मचारयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

 हा संपुर्ण कार्यक्रम मास्क, सैनिटाइजर, सुरक्षित अंतर राखून पार पाडला.

कार्यक्रमाचे आयोजन एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सोलापूर विभागीय अध्यक्ष व सोलापूर मनपा नगरसेवक विनोद भोसले, राज्य कार्याध्यक्ष, विभागीय सचिव श्रीकांत सड्डु, यांनी केले होते.

यावेळी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, शाहु सलगर, तसेच सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री टापरे साहेब, DYME श्री जोंधळे साहेब, यंत्र अभियंता चिक्रुडे साहेब, कामगार अधिकारी टापरे साहेब, विभागीय वाहतुक अधिकारी विलास राठोड साहेब, सोलापुर आगार व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी साहेब, आदी उपस्थित होते उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय उपाध्यक्ष श्री राजाभाऊ शिंदे, विभागीय कार्यालय सचिव बंडोपंत जळगावकर, अध्यक्ष वर्षा चक्रनारायण, कार्यशाळा सचिव सुनिल साळुंके, आगार अध्यक्ष श्री रविंद्र गायकवाड, आगार सचिव श्री सदाशिव अंबुरे, ब्रम्हानंद शिंदे, उपाध्यक्ष राजू जाधव, बसवराज कोळी, सौरभ साळुंखे आदी नहीं तसेच इंटक पदाधिकारी, सभासद बंधु-भगिनीं प्रयत्नशील होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget