युवा उद्योजकाकडून कोरोना रुग्णांना स्नेहाचा ओलावा
वृत्तसंस्था (प्रतिनिधी)
कोरोनामुळे एकीकडे कुटुंबातील रक्ताच्या नात्यांनाही परकेपणा आला आहे तर दुसरीकडे मात्र सामाजिक बांधिलकीची जाण आसणारे आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहे. ब्रह्मपुरी ( ता मंगळवेढा) येथील
तरुण उद्योजक तुकाराम पुजारी यांनी कोरोनाच्या आपत्ती काळात आपला वाढदिवसाचा खर्च टाळून मंगळवेढा येथे कोव्हिडं सेंटर मध्ये असणाऱ्या तालुक्यातील सर्व रुग्णांना सुकामेव्याचे पाकीट वाटून स्नेहाचा ओलावा जपण्याचा प्रयत्न केला आहे
मंगळवेढा येथील कोव्हिडं सेंटरमध्ये डॉक्टरस, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी , महसूल व पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत आहेत तर शंभू टेक्सटाईलचे मालक तुकाराम पुजारी यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी असणाऱ्या युवा उद्योजकाने समाजकडून दुर्लक्षित असणाऱ्या कोरोना ग्रस्त रुग्णांना सुकामेव्याची भेट देऊन कुटुंबातील व्यक्ती सारखा जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न केला आहे कोरोना रुग्णांना सकस आहार व व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते ही बाब हेरून तुकाराम पुजारी यांनी कोरोनाच्या आपत्ती काळात आपला वाढदिवस साजरा न करता यावर बचत होणारा खर्च कोरोनाग्रस्त रुग्णांवर व कोव्हिडं योद्धा असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खर्च करण्याचा निर्धार केला त्याप्रमाणे वाढदिनी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्याकडे सर्व कोरोना रुग्णासाठी सुकामेव्याचे पाकिट व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १०० मास्क सुपूर्त करण्यात आले उद्योजक तुकाराम पुजारी यांनी मॉलमधून रुग्णांसाठी ६० पाकिटे बनवून घेतली प्रत्येक पाकीट १०० ग्राम ते २०० ग्रॅम वजनाची असून यामध्ये मनुके, बदाम, खजूर याचा समावेश आहे महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही पाकिटे कोव्हिडं सेंटर वर जमा करण्यात आली कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येक रुग्णाला ते वितरित करण्यात येणार आहे कोरोनाच्या काळात प्रशासनातील अधिकारी, वैद्यकीय , पोलीस व आरोग्य अधिकारी व कर्मचारीमधील माणुसकी रुग्णांसाठी मोठा मानसिक आधार ठरत आहे प्रशासनाबरोबर तुकाराम पुजारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोनाग्रस्तांसाठी स्नेहाचा ओलावा देण्याचा प्रयत्न केला आहे याप्रसंगी विकास पुजारी, राहुल गुरव, बच्या चव्हाण , सोमनाथ पुजारी, यांच्यासह तुकाराम पुजारी मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते
चौकट------
.........अन्यथा नाती संपतील--पो.नि . गुंजवटे
कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्या कुटुंबाला आजारापेक्षा समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याची अनेक उदाहरणे आज समोर येत आहेत समाजाच्या वेगळ्या नजरेतून कोरोना योद्धा डॉक्टर सुद्धा बचावले नाहीत तरी कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि कोरोना व्यक्तींविषयी अफवा पसरवण्यापेक्षा त्यांना मानसिक आधार द्या असा मोलाचा सल्ला पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी याप्रसंगी दिला

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.