'रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण'


वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात दूध दराचा प्रश्न पेटला आहे. गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरातील टिटवे येथे गोकुळ दूध संघाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिले. सांगली जिल्ह्यातही एक टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी,  रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 


सुनील केदार म्हणाले, की  'दूध दर प्रश्नावर मंत्रालयात आज दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. कोरोनाच्या लढाईत गोरगरिबांना दूध वाटप करा. दुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंत्रालयात ही बैठक होणार आहे.'

पाच वर्षे सत्तेत असताना भाजपने दूध दरावर काय केलं? असा प्रश्न सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दूध दराबाबत केंद्र सरकारने हातभार लावावा, असेही ते म्हणाले.

'स्वाभिमानी' आक्रमक

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरातील टिटवे येथे गोकुळ दूध संघाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिले. सांगली जिल्ह्यातही एक टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी कमालीची खबरदारी घेतली असून तावडे हॉटेल सांगली फाटा तसेच हातकणंगले बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुधाला ५ रुपये अनुदान देण्यासाठी सुबुद्धी देवो, शेतकऱ्यांवरचे संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज उदगाव (ता. शिरोळ) येथील श्रावणच्या पहिल्या दिवशी श्री रामलिंग मंदिरात दुधाचा अभिषेक करून साकडे घातले.

पुण्यात शेतकरी संघटनांसह भाजप मैदानात
पुण्यातही पुणे शहर भाजप आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या दुधाला भाववाढ मिळावी, अशी मागणी केली. यावेळी खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी नेते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget