सेतूबंध प्रतिष्ठान पुळूज यांच्या वतीने सजग नारी सतर्क नारी उपक्रमाचे आयोजन




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

सेतूबंध प्रतिष्ठान पुळूज ता. पंढरपूर या फिरत्या वाचन चळवळीच्या वतीने प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर दर रविवारी सकाळी ठीक ८.०० वाजता सजग नारी सतर्क नारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

आपापल्या क्षेत्रात सजग व सतर्क राहून अव्याहतपणे आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उजळवत असलेल्या महाराष्ट्रातील कर्तृत्वसंपन्न महिलांच्या मनातील भावना त्यांच्याच वाणीतून समाजात पोहचाव्यात व समाजातील इतरांना प्रेरणादायी ठराव्यात या पवित्र उद्देशाने सेतूबंध प्रतिष्ठानने उपरोक्त उपक्रमाचे आयोजन केले आहे.

आपणास परिचित आहेच की गेल्या अनेक वर्षांपासून सेतूबंध प्रतिष्ठान ही चळवळ फिरते वाचनालय चालवत आहे. या माध्यमातून घरपोच पुस्तके वाचायला उपलब्ध करून देण्यात येतात. व महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्य कृतींना पुरस्कार देऊन प्रतिष्ठानच्या वतीने गौरवण्यात येते. आपला दैनंदिन व्यवहार जपत अखंड समाजकार्यात सेतूबंध प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व सहकारी निरपेक्ष वृत्तीने काम करतात.

सेतूबंध प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमात अधिकाधिक साहित्यिक व वाचकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सेतूबंध प्रतिष्ठानचे समन्वयक सूर्याजी भोसले यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget