विश्व वारकरी सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.




सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील परिसरात विश्व वारकरी सेनेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले विश्व वारकरी सेना राष्ट्रीय संपर्कप्रमुख व राष्ट्रीय प्रवक्ते तुकाराम महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली व हरी महाराज लोंढे विश्व वारकरी सेना मोहोळ तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.

तुकाराम महाराजांच्या अभंग अनुसार वृक्षवल्ली आम्हा आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती जगद्गुरु विश्व मान्य विश्वभुषण विश्व अधिकार विश्व प्रिया जगद्गुरू तुकोबाराय यांनी या अभंगातून निसर्गाचं स्पष्टीकरण पटवून दिलेले आहे.

तुकोबाराय या अभंगातून पटवून देतात की, यामध्ये निसर्गाचे संरक्षण करा सध्या एक विचार आपण जर केला तर त्यामध्ये झाड लावण काळाची गरज आहे म्हणून विश्व वारकरी सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये जवळपास ३०० रोपे लावण्यात आली त्यामध्ये कडूनिंब कारंजी चिंच शावर अशा प्रकारचे रोपे लावण्यात आली कमी प्रमाणात या रोपांना पाणी लागते म्हणून हे रोपे प्रामुख्याने लावली गेली यामध्ये एक संकल्पना केली माणसाने एक दिवस आपल्या वृक्षासाठी घ्यावा हीच संकल्पना बाळगून विश्व वारकरी सेनेने वृक्षारोपण करून समाजापुढे आदर्श निर्माण केलाआहे. सर्वच वारकरी बंधू  सोशल डिस्टंसिंग पाळून हा कार्यक्रम पार पाडला आहे.

यावेळी कालिदास भोसले महाराज व संजय भोसले साहेब व शारदा ताई गायकवाड हनुमंत भोसले बापू श्रेयस महाराज श्रीखंडे हरिभाऊ महाराज मुळे भाऊ महाराज सर्व नामदेवजी नागटिळक व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget