अकलूज परिसरात कोरोना संसर्ग वाढतोय जबाबदार कोण?



वृत्तसंस्था // प्रतिनिधी
१) बाहेर जाण्यासाठी पास काढायला गेलेला वेक्तीला आजारी आहे का नाही हे न बघता पास दिला जातोय.
२) कंटेनमेंट झोन मधील कोरोना बाधित असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कातले लोक निवांत गावात फिरतात.
३)अकलूज शहरात येणारे प्रत्येक रस्ते खुले आहेत.
४)अकलूज मधील सर्वच बँका,किराणा दुकाने,हॉटेल, मोबाईल दुकाने,यांच्याकडून कसलाच सोशल डिस्टन्स पाळला जात नाही.
५) अकलूज मधील कित्येक दुकानदार शासनाने नेमून दिलेल्या नियमांप्रमाणे येणाऱ्या कस्टमरची नोंद करून घेत नाही.
६)अकलूज मध्ये फिरून व्यापार करणारे,चहावाले,हॉटेल वाले,दिवसभरात शंभर जणांच्या संपर्कात येतात यांना का थांबवल जात नाही ? पेशंट वाढण्याची वाट बघत आहात का ?
 ७) नागरिक मास्कचा वापर फक्त पोलिसांपासून बचावासाठी करतात..! नागरिकांनी स्वतःची नाही तर इतरांची तरी काळजी करावी आणि घरात थांबावे..!
८) जिल्हा बंदी असताना बहुसंख्येने लोकांची ये - जा चालू आहे. मग का कोरोनो पेशंट वाढणार नाहीत ?
९) अकलूज मध्ये फक्त कंटेनमेंट झोन मध्ये औषध फवारणी केली जाते.इतर परिसरात केली जात नाही.प्रशासनाकडे पैसे नसतील तर आम्हाला सांगावे आम्ही गावातून वर्गणी गोळा करतो पण सर्व परिसरात औषध फवारणी करा.

अकलूज परिसरामध्ये कोरोना रोग झपाट्याने वाढत आहे. अधिकारी वर्गाचं काम म्हणजे लाव लिजाव टमकी बजाव चालू आहे.आणि नागरिक ही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. माय बाप हो तुमच्या छोट्या-मोठ्या पैसे कमाई कडे बघू नका स्वतः बरोबर आपलं गाव आपलं कुटुंब आहे.सर्वांची काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा.
*प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी झोकून देऊन नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी*

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget