पंढरपूर // प्रतिनिधी
श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर ९ जुलै रोजी प्रक्षाळ पूजेचा धार्मिक विधी चालू होता. तेव्हा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीच्या एका अधिकार्यास गाभार्यातच स्नान घातल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला. त्याही पुढे जाऊन स्नान घातलेल्या अधिकार्यांनी ‘आमचीच प्रक्षाळ पूजा केली की ?’ असा प्रश्न केल्यावर उपस्थित पुजार्यांनीही ‘हे असेच असते’ असे उत्तर दिल्याचे व्हिडिओतून दिसले. हे अत्यंत निषेधार्ह असून या प्रकाराविषयी विठ्ठलभक्त, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सरकारीकरण झाले असले, तरी सरकारी अधिकार्यांनी मंदिरे ही सरकारी कार्यालये नाहीत याची जाणीव ठेवावी. मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर प्रशासनाकडून सातत्याने असे गैरप्रकार होत आहेत. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुनील घनवट ,महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती यांनी केली आहे.
श्रीविठ्ठलाच्या गाभार्यातच सेक्युलर प्रशासनाच्या अधिकार्याला देवासोबत स्नान घालून त्यांना देव बनवण्याचे काम पुजार्यांनी करू नये. कोरोना काळातील जमावबंदीच्या नियमाकडे बोट दाखवून छत्रपती शिवरायांच्या रायगडावरून आलेल्या पालखीला पंढरपूरच्या मंदिरात न सोडणार्या प्रशासकीय अधिकार्यांनी मंदिरातील धार्मिक नियमांचे पालन का करू नये ? त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांकडे
हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाडये यांनी केली आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.