कामासाठी सोलापूर ते मोहोळ असा केला होता प्रवास
सोलापूर // प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत जात आहेत़ दरम्यान, जुळे सोलापुरात राहणा-या एका न्यायालयीन कर्मचाºयाचा कोरोनाने शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.
जुळे सोलापुरातील लक्ष्मी बँक कॉलनीत राहणा-या या कर्मचाºयाने कामासाठी सोलापूर ते मोहोळ असा मोटारसायकलवरून प्रवास केला होता. यातून या कर्मचाºयास गेल्या आठवड्यात त्रास झाला होता. त्यामुळे उपचारासाठी तो रूग्णालयात दाखल झाल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांची आई, पत्नी व मुलास क्वारंटाईन केले असता त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सहकारी कर्मचाºयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.