या अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देश हळहळला!



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला काही आठवडे झाले आहेत. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून त्याचे चाहते अजून सावरले नाहीत, तोपर्यंतच मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केली आहे.

कन्नड टेलिव्हिजन अभिनेता सुशील गौडा (Actor Susheel Gowda) ने त्याचे होमटाऊन मंड्या (Mandya) याठिकाणी आत्महत्या केली आहे. कन्नड इंडस्ट्रीमध्ये नावारूपास येण्यासाठी सुशील प्रयत्नशील होता.

त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या जाण्याने टेलिव्हिजन विश्व, त्याचे चाहते आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

त्याने 'अंतपूरा' या रोमँटिक मालिकेमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार सुशीलने ७ जुलै रोजी आत्महत्या केली आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच सुशील फिटनेस ट्रेनर आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी मेहनत करत होता.

सुशील त्याच्या आगामी Salaga या चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार होता. अभिनेता दुनिया विजय या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. सुशीलच्या आत्महत्येनंतर विजयने त्याचे दु:ख व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला तो हिरो मटेरियल वाटला होता. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो सोडून गेला.

कोणतीही समस्या असेल तरी त्याचे उत्तर आत्महत्या करणे असू शकत नाही. मला असं वाटतंय की यावर्षी मृत्यूचे सत्र सुरूच राहील. हे केवळ कोरोना व्हायरसमुळे नाही , लोकांचा विश्वास कमी होत आहे कारण त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. अशावेळी धीराने राहणे आवश्यक आहे".

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget