श्री विठ्ठलाची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. संभाजी ब्रिगेड यांच्याकडून जलसंपदा मंत्री मा. जयंत रावजी पाटील यांच्याकडे मागणी. (कारवाई करण्याचे दिले आश्वासन)




पंढरपूर // प्रतिनिधी

आषाढी यात्रेची सांगता विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेने होत असते. यावेळी श्री विठ्ठलाची पूजा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते होती. पूजा चालू असताना विठ्ठलाचे नामस्मरण व मंत्र म्हणने अपेक्षित होते.
परंतु चेष्टामस्करी वायफळ गप्पा मारत श्री विठ्ठलाला स्नान घालत असताना मंदिराची कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा श्रीविठ्ठलाच्या स्नानासाठी आणलेली पाणी व चांदीच्या पात्रातून स्नान घालण्यात आली.
खरे तर पूजा चालू असताना पुजाऱ्यांनी पूजा करणे अपेक्षित होती परंतु कार्यकारी अधिकारी जोशी यांनी तेथेही हस्तक्षेप करून स्वतःच पूजा करून स्वतःची पूजा करून घेत होते. विठ्ठलाच्या व संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा अपमान आहे व ही श्री विठ्ठलाची विटंबना आहे.
व खालच्या कार्यक्रमाला कोणताही हक्क अधिकार सेवेकऱ्यांना नसताना व कोर्टाचा अवमान करून मदन महाराज हरिदास यांना खांद्यावर बसवून  कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केली आहे.
अशा नालायक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करावी नाही केल्यास  संभाजी ब्रिगेड जन आंदोलन करेल.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget