वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या साथीमुळे २२ मार्चपासून देशभर लॉकडाऊन लागु झाल्याने बेस्ट प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध केला होता. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या बस पासचे वितरण व नूतनीकरणही स्थगित केले होते. ८ जूनपासून संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने बेस्टची सेवाही सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली असून २९ बसपास वितरण नूतनीकरण केंद्रांना गुरुवार ९ जुलै पासून सुरू करण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे. २२ मार्च ते ७ जूनपर्यंत ज्या प्रवाश्यांना आपल्या पासआधारे बससेवेचा लाभ घेता आला नाही. त्यांना त्या बसपासचा बुडालेल्या दिवसाची परतफेड म्हणून "जेवढे दिवस बुडाले तेवढे दिवस" त्यांच्या पासांना मुदतवाढ देण्याची अंमलबजावणी. ९ जुलैपासून करण्यात येणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.