सोलापूर // प्रतिनिधी
शंभर वर्षे जूना इतिहास असलेला मोहोळचा आठवडा बाजार बंद करुन त्याठिकाणी नगरपरिषदेची नियोजित नवीन इमारत बांधणेचा ठराव मोहोळ नगरपरिषदेने व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे चुकीच्या पध्दतीने घेतला असून मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी सदर ठिकाणी आठवडा बाजार भरवून मोहोळ शहराचे गत वैभव व व्यापारी महत्त्व कमी करण्याचे हेतुने कुटील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करित असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सतीशआप्पा काळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी पुढे बोलताना सतीश आप्पा काळे म्हणाले की, मोहोळ नगरपरिषदेची जुनी इमारत मोहोळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व सर्व जनतेला सोयीची असून सदरची जागा प्रशस्त असल्याने या ठिकाणीच नियोजित नवीन इमारत झाली पाहिजे. अन्यथा भारतीय जनता पार्टी च्या वतीने या निर्णया विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी दिला आहे.
यावेळी सतिशआप्पा काळे पुढे म्हणाले की, वास्तविक पाहता मोहोळ नगरपरिषदेच्या नगरसेवकांची मिटिंग व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार असल्याचा अजेंडा विरोधी नगरसेवकांना दिनांक आठ जुलै रोजी पोहोच करण्यात आला. परंतु मिटींग आयोजित केलेल्या दिवशी सकाळी 11 वाजता घेण्यात येणारी मीटिंग दुपारी पावणे बारा वाजता सुरू करण्यात आली. यामध्ये दुर्दैव असे की मोहोळ नगरपरिषदेच्या 17 नगरसेविकापैकी 2 नगरसेवकांना अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे त्यांना या मीटिंगमध्ये सहभागी होता आले नाही. त्यामुळे सदरची व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेतलेली मिटिंग ही बरखास्त करून कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून यापुढील मीटिंग नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात यावी व त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन मूळ नगरपरिषदेची नियोजित इमारत ही आहे या जागेवर मध्यवर्ती ठिकाणी घेण्यात यावी अशी भारतीय जनता पार्टीची आग्रही मागणी आहे. त्यामुळे मोहोळ नगरपरिषदेची इमारत कोठे बांधायची? बाबतचा वाद मोहोळ नगरपरिषदेच्या कारभाऱ्यांनी घालण्या पेक्षा सध्याच्या कोरोना महामारीमुळे भयभीत झालेल्या जनतेला सर्वतोपरी आधार देणं, लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य, रस्ते, निवारा, दिवाबत्ती, जनतेचे मूलभूत प्रश्न व सोयीसुविधा पुरविणे, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय पुर्वपदावर आणणे, गरीबांच्या हाताला काम देणे, लोकांची सुरक्षितता आबाधित राखणे.... इत्यादी बाबीला सत्तानाऱ्यांनी अधिक महत्त्व व प्राधान्य द्यायला हवे. परंतू जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्ना पेक्षा जो तो व्यक्तिगत कुरघोडीचं व संधीसाधू राजकारण करत असल्याने नगरपरिषद इमारत बांधण्याच्या निरर्थक वादावरुन यातील राजकालण कशासाठी चालले आहे हे आता आमच्या लक्षात आले आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
सध्या नगरपरिषदेतील प्रशासनातला सावळा गोंधळ, विकास कामातील भ्रष्टाचार, सफाई कामगारांचे अर्थीक शोषण, पदाधिकाऱ्यांची बेफीकिर वृत्ती हा सर्व प्रकार भयंकर असून या बोकाळलेल्या बजबजपुरीचे पितळ आता उघडे पडलेलेच आहे. या व अशा अनेक प्रश्नावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच संमंधितांनी "नगरपरिषद इमारतीचा" वाद आता या अनावश्यक वेळी उकरुन काढलेला असावा. परंतु ज्यांनी कोणी सावळा गोंधळ घालून जनतेची फसवणूक करुन शासनाला टोपी घातलेली आहे, त्यांचे पितळ उघडे पाडल्या शिवाय "भारतीय जनता पार्टी" आता स्वस्थ बसणार नाही! आता आमचा मुकाबला फक्त मिलिभगत वाल्यांशी नसून आमचा मुकाबला "महा मिलीभगत" वाल्यांशी देखील आहे, हे संधीसाधू राजकारण्यांनी ध्यानात ठेवावं. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जर कोणी जनतेच्या आरोग्याशी, जिवाशी बेफिकीरपणे खेळणार असाल तर हि नागनाथ महाराजांची नगरी कोणालाही माफ करणार नाही हे ही लक्षात असू द्या. असेही सतिशआप्पा काळे यांनी शेवटी नमूद केले आहे.
या पत्रकार परिषदेत संजीव खिलारे, रामभाऊ खांडेकर, महिला आघाडी माजी जिल्हा उपाध्यक्ष व माजी जि.प.सदस्या शुभांगीताई क्षीरसागर, मोहोळ तालूका युवा मोर्चाचे अध्यक्ष अजय कुर्डे, मोहोळ शहराध्यक्ष सुरेश राऊत, मोहोळ तालूका सोशल मिडिया अध्यक्ष अजय गावडे, किसान सेल तालूका अध्यक्ष तानाजी दळवे, ओबीसी सेल अध्यक्ष महेश चेंडगे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सतिशआप्पा काळे
मोहोळ तालूका अध्यक्ष- भारतीय जनता पार्टी

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.