पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोना या महाभयंकर आहे जे जे औषधे लागतात त्यामध्ये रेमेडेसिवीर,टाॉसिलीझुमाब,आयटोलिझुमाब, या इंजेक्शनचे दर जाहीर करावेत तसेच त्याचे जाहीर प्रसिद्धी करण प्रत्येक वर्तमानपत्राच्या फ्रंट पेज वर द्यावेत अशा स्वरूपाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक नागरिक कोरोना मुळे त्रस्त आहेत. आणि कोणा ग्रस्त रुग्ण वेगवेगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्यावर उपचार करणे डॉक्टर हे रेमडेसिवीर, टॉसिलीझूमाब,आयटोलिझुमाब हे इंजेक्शन मेडिकल स्टोर मधून आणण्यास सांगत आहेत. परंतु मेडिकल दुकानदार त्या इंजेक्शन ची किंमत खूप सांगत आहेत. यामध्ये हजार रुपयांची लूट होत आहे आपण आज ज्या प्रमाणे इंजेक्शन कुठे उपलब्ध आहे त्या मेडिकल दुकानाची यादी वर्तमान पत्रांमध्ये जाहीर केली आहे. त्याप्रमाणे त्याची किंमत देखील वर्तमानपत्रांमध्ये जाहीर करावी हे नम्र विनंती. जेणेकरून वरील इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.