पंढरपूर // प्रतिनिधी
जिल्ह्यातील दुध उत्पादकांना सध्या स्थितीमध्ये २०रूपये इतका दर मिळत आहे.मागच्या सरकारने ३५ रूपये इतका प्रति लिटर दर दिला होता.सध्या या शासनाच्या कळात मिळणा-या दरातून दूधाचा उत्पादन खर्चही फिटत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे दुधाला जास्त दर मिळणे गरजेचे आहे.दूध उत्पादकांची स्थिती फार बिकट झाली आहे.दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा, जगविण्याचा खर्च मात्र थांबत नाही. उलटचारा,पेंड,सरकी,पशुखाद्य,औषधे उपचार यासह सर्वच बाबीचा दर वाढल्याने दूध उत्पादकाचा खर्च दडीपट झाला आहे. विक्रीचे दर पडले आहेत.त्यामुळे दूध उत्पादकांना रोज तोटा सहन करावा लागत आहे. या सर्व बाबीचा विचार करून दूध उत्पादक शेतक-यांच्या दूधाला भाव वाढवून देण्यात यावा.परंतु राज्य शासनाने अद्याप कोणतेही ही निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी व दूग्ध व्यवसाय यांच्या हितासाठी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने ठोस पाऊल उचलावे लागतील.त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतक-यांच्या दूधाला किमान ३५रूपये दर व १०रूपये अनुदान शेतक-यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करावे यासाठी माय बाप पांडूरंगाने या शासनाला सद बुध्दी देवो ही पांडूरंगा तुझ्या चरर्ण प्रार्थना करतो.
दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला भाव वाढवून नाही मिळाला तर पांडूरंगाच्या मुर्तीला दूधाचा अभिषेक घालून पुढील दिशा आंदोलन ठरवली जाईल असे आव्हान शिवबुध्दचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे यांनी दिले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.