पंढरपूर // प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2019-20 मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे. टन रू.200/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम रू. 14 कोटी जमा केली आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णीसाहेब यांनी दिली.
श्री पांडुरंग सह. सा.कारखाना हा आदरणीय सुधाकरपंत परिचारक मालक व जिल्याचे आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून मागील गाळप हंगामात संपुर्ण महाराष्ट्रात ऊसाचा तुटवडा होता परंतु श्री पांडुरंग कारखान्यास या हंगामात ऊसाची कमतरता जानवली नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून या हंगामात कारखान्यास ऊस देवून सहकार्य केले आहे त्यामुळे गाळप हंगाम 2019-20 मध्ये कारखान्याने 7,00,100 मे. टन ऊस गाळप करून 11% सरासरी साखर उताऱ्याने 7,63,190 क्विं. साखरेचे उत्पादन घेेवून कारखान्याने उद्दीष्ठपुर्ती केली आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कोवीड-19 च्या परिस्थितीमुळे अर्थिक संकटात असताना श्री पांडूरंग कारखान्याने मात्र गळीत हंगाम 2019-20 मध्ये गाळप केलेल्या ऊसास पोळा सणासाठी प्रती मे. टन रू. 200/- प्रमाणे ऊस बील दिलेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांना महत्वाचा असणारा पोळा सण हा मोठ्या आनंदात साजरा करणेसाठी पैशाची गरज असताना कारखान्याने ऊस बिलाची रक्कम बँकेत खात्यावर वर्ग केली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
गाळप हंगाम 2019-20 मध्ये केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार कारखान्याची FRP रु. 2506/- प्रति मे. टन असून कारखान्याने या गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसास पुर्वीच रु. 2100/- प्रति मे.टन प्रमाणे एकरक्कमी ऊस बिल दिले असून सध्या पोळा सणासाठी शेतकऱ्यांना रु .200/- प्रमाणे ऊस बील देत आहोत. उर्वरीत FRP ची रक्कमही लवकरच देणार असून FRP पेक्षा जास्तीची रक्कमही कारखाना व्यावस्थापण देण्याचा विचार करीत आहे. केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार शेतक-यांना आतापर्यंत 92 % FRP ची रक्कम अदा केली आहे.
गळीत हंगाम 2020-21 सुरु करणेचे दृष्टीने कारखान्यामधील कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पुर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरु केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वहातुक यंत्रणा सक्षमपणे उभारली असून त्यांना पहिल्या ऍ़डव्हान्स हप्त्याचे वाटपही पुर्ण केलेले असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक डर. यशवंतराव कुलकर्णी यांनी सांगितले आहे.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.